नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड शहरातील हनुमानगड येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी वंजारी समाजाने नांदेड येथे मंजूर झालेल्या कृषी महाविद्यालयास स्व. गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्याची मागणी वंजारी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष संतराम गीते यांनी एका निवेदनाद्वारे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.
यावेळी श्रीकर फड, रावसाहेब घुगे, व्यंकटेश साठे, राजू केंद्रे यांच्या सह वंजारी समाज बांधव उपस्थित होते.