भोकर जवळी सुधा प्रकल्पात सापडला 35 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह ; भोकर पोलीसांचे ओळख पटविण्यासाठी जनतेला आवाहन

नांदेड(प्रतिनिधी)-भोकर जवळील सुधा प्रकल्पाच्या पाण्यात 11 डिसेंबर रोजी दुपारी 3.30 वाजेच्यासुमारास दोन्ही हात पाठीमागे बांधलेल्या अवस्थेत एक अनोळखी प्रेत सापडले आहे. भोकर पोलीसांनी या अनोळखी प्रेताची ओळख पटविण्यासाठी जनतेला आवाहन केले आहे.
दि.11 डिसेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता सुधा प्रकल्पाच्या पाण्यात एका 35 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह दोन्ही हात पाठीमागे बांधलेल्या अवस्थेत सापडला आहे. या व्यक्तीचे वय अंदाजे 35 वर्ष असावे. त्याचा रंग सावळा आहे, उंची 6 फुट आहे, त्याच्या उजव्या हाताच्या मनगटावर Sunny NARESH असे गोंदलेले आहे. त्यानंतर चार चॉंदण्या कोरलेल्या आहेत आणि त्या खाली Sindhu, priya असे गोंदले असून पुढे तेलगु भाषेत काही तरी मजकुर लिहिलेला आहे. गोंदलेलेली दोन नावे खोडलेली दिसत आहेत. डाव्या हातावर त्रिशुलचे चिन्ह गोंदलेले आहे. या अनोळखी व्यक्तीच्या शरिरावरील कपडे निळ्या रंगाची Wrangler कंपनीची जिन्स पॅन्ट, काळ्या रंगाचा स्वेटर Adidas कंपनीचा, टी-शर्ट पिवळ्या रंगाचा, बनियान हाफ बाह्याची काळ्या रंगाची, अंडर पॅन्ट कट साईज Thaila कंपनीची, कंबरेला काळा करदौरा बांधलेला आहे. प्राथमिक दृृष्ट्या या व्यक्तीचा कोठे तरी दुसऱ्या जागी खुन करून त्याचा मृतदेह सुधा प्रकल्पात आणून टाकला असावा अशी शक्यता आहे.
भोकरचे पोलीस निरिक्षक नानासाहेब उबाळे यांनी जनतेला आवाहन केले आहे की, या अनोळखी व्यक्तीला कोणी ओळखत असेल तर याबाबतची माहिती पोलीस ठाणे भोकर येथे कळवावी किंवा निरिक्षक उबाळे यांचा मोबाईल क्रमांक 9823045224 किंवा पोलीस उपनिरिक्षक आडे यांचा मोबाईल क्रमंाक 9763944444 यावर कळवावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *