कृषि विभाग व तिफण फाउंडेशन यांच्यावतीने सर्वांसाठी महामिलेट प्रश्नमंजुषा स्पर्धा

नांदेड (जिमाका) – आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 च्या अनुषंगाने व्यापक जनजागृती व्हावी या उद्देशाने कृषि विभाग आणि तिफण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय महामिलेट प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली आहे. सदर स्पर्धा गुगल प्ले स्टोअर वरील ॲन्ड्रॉइड ॲप MahaMilletsQuiz च्या माध्यमातुन ऑनलाईन पध्दतीने घेतली जाणार आहे.

 

या स्पर्धेत विद्यार्थी, शाळा, शेतकरी, संस्था, सर्वसाधारण व्यक्ती यांना सहभाग घेता येईल. सर्वांसाठी खुली असलेल्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शाळा / संस्था, विद्यार्थी / वैयक्तीक अशी सुवीधा उपलब्ध आहे. शाळा/संस्था यांनी लॉगीन मधुन त्या संस्थेच्या माध्यमातुन स्पर्धेमध्ये किती लोक जोडले गेले हे दिसेल. ही स्पर्धा तीन फेऱ्यात होईल. पहील्या फेरीत 10 प्रश्न 50 गुण, दुसऱ्या फेरीत 20 प्रश्न 80 गुण, तृतीय फेरीत 40 प्रश्न 80 गुण असतील. सर्वात जास्त सदस्य संख्या असलेल्या जिल्हयास विशेष बाब म्हणुन गौरविण्यात येणार आहे. त्याच सोबत स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या उत्तीर्ण सहभागींना डिजीटल प्रमाणपत्र डाउनलोड करता येणार आहे.

 

मिलेटस प्रश्नमंजुषा स्पर्धेने तृणधान्याचे महत्व सर्वांना समजुन येणार आहे. वैश्विक स्तरावर तृणधान्याला महत्व प्राप्त झाले आहे. त्याचा प्रत्येकाच्या आहारातील वापर वाढला पाहिजे यासाठी ही स्पर्धा घेतली जात आहे. सर्वांनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *