नांदेड(प्रतिनिधी)-मच्छीमारांची पगार फुकट खाऊन तुम्ही माजला आहात असे म्हणून मस्य आयुक्त कार्यालयात टेबलवरील साहित्यांची फेकाफेकी करून शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुध्द वजिराबाद पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सहाय्यक आयुक्त मस्य विभाग मोहम्मद अजहर मोहम्मद दस्तगिर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते 13 डिसेंबर रोजी मस्य कार्यालय डॉक्टर्सलेन येथे बसले असतांना दुपारी 4.40 वाजेच्यासुमारास सायलु नागाभोई ओनरवाड रा.गंजगाव ता.बिलोली जि.नांदेड हा व्यक्ती कार्यालयात आला आणि तुम्ही खोट्या लोकांचे फॉर्म भरून पाठवत आहात. तुम्ही कोणतीही शासकीय योजना आम्हाला दिलेली नाही. मी माहितीच्या अधिकारात जिल्हाधिकारी कार्यालयात जावून अर्ज देतो आणि तुम्हाला कसे घोडे लावतो ते पाहा. मच्छीमारांची फुकट पगार खाऊन तुम्ही सर्व जण माजला आहात. तुम्हील आम्हाला योजनांचे प्रस्ताव का बनवू देत नाही. आमची मच्छीमार संघटना तुमच्या मागे लागली तर तुम्हाला पळती भुई थोडी होई, मी तुम्हाला अदल घडविल असे शब्द बोलत अजहर, आठवले, व्यवहारे यांना धमकावले. ऑफीसच्या टेबलीवरील फाईल उचलून अस्थाव्यस्थ फेकून दिल्या, के.के.सी.फॉर्म फाडून टाकले.
या तक्रारीवरुन वजिराबाद पोलीसांनी सायलू नागाभोई ओनरवाडविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 504, 506 प्रमाणे गुन्हा क्रमांक 567/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक जयश्री गिरे यांच्याकडे देण्यात आला आहे.