राज्यात १४ प्रमुख जिल्हा न्यायाधीशांच्या बदल्या;नांदेडचे न्हावकर यवतमाळ आणि लातूरचे कोसामकर नांदेडला;कंधारचे जिल्हा न्यायाधीश धुळेंचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश

मुंबई,(प्रतिनिधी)- उच्च न्यायालय मुंबईचे महाप्रबंधक आर.एन. जोशी यांच्या स्वाक्षरीने जरी झालेल्या आदेशानुसार राज्यातील १४ प्रमुख जिल्हा न्यायाधीशांना नवीन नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.नांदेडचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश एन.व्ही.न्हावकर हे यवतमाळ जिल्ह्यात जाणार आहेत.तसेच लातूर येथील प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस.एस.कोसामकर नांदेड जिल्ह्यात येणार आहेत.

१४ डिसेंबर २०२३ रोजी जारी झालेल्या आदेशानुसार प्रमुख जिल्हा न्यायाधीशांच्या बदल्या करून त्यांना नवीन नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.त्यात नांदेडचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश एन.व्ही.न्हावकर हे यवतमाळ जिल्ह्यात जाणार आहेत.तसेच लातूर येथील प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस.एस.कोसामकर नांदेड जिल्ह्यात येणार आहेत.

धर्मादाय आयुक्त मुंबई (प्रमुख जिल्हा न्यायाधीश पुणे),व्ही.व्ही.पाटील – पहिले अतिरिक्त प्रमुख जिल्हा न्यायाधीश महानगर न्यायालय दिंडोशी मुंबई- (प्रमुख जिल्हा न्यायाधीश लातूर),एस.सी.खत्री- प्रमुख जिल्हा न्यायधीश बुलढाणा (प्रमुख जिल्हा न्यायधीश लातूर),एस.व्ही.हंडे-प्रमुख जिल्हा न्यायधीश यवतमाळ (प्रमुख जिल्हा न्यायधीश बुलढाणा,ए.एन.करमरकर-प्रमुख जिल्हा न्यायधीश वर्धा (प्रमुख जिल्हा न्यायधीश गडचिरोली),आर.एस. तिवारी-प्रमुख जिल्हा न्यायधीश नंदुरबार (प्रमुख जिल्हा न्यायधीश अकोला),यू.बी,शुक्ला- प्रमुख जिल्हा न्यायधीश गडचिरोली (प्रमुख जिल्हा न्यायधीश नंदुरबार),एस.जे.भारूका – प्रमुख जिल्हा न्यायधीश सिंधदुर्ग Oros (प्रमुख जिल्हा न्यायधीश वर्धा),व्ही. आर. जोशी प्रमुख जिल्हा न्यायधीश रत्नागिरी (प्रमुख जिल्हा न्यायधीश सातारा),एम.ए.आनंद – प्रहिले जिल्हा न्यायाधीश कंधार जिल्हा नांदेड (प्रमुख जिल्हा न्यायधीश धुळे ०२/०१/२०२४),एस एस.गोसावी- पहिले जिल्हा न्यायाधीश अहमदनगर (प्रमुख जिल्हा न्यायधीश रत्नागिरी), एच.बी. गायकवाड – न्यायधीश कुटुंब न्यायालय पुणे (प्रमुख जिल्हा न्यायधीश सिंधदुर्ग Oros)

तसेच उच्च न्यायालयाने अहमदनगर येथील पहिले जिल्हा न्यायधीश एस एस.गोसावी यांची बदली झाल्याने अहमदनगर येथील पाच जिल्हा न्यायाधीशांची रँक बदलली आहे. त्यांची नवे रँक प्रमाणे अशी आहेत. १) श्रीमती एम.ए. भरालीया २) एन.आर.नाईकवाडे ३) पी.आर.सितरे ४) श्रीमती एस,व्ही,सहारे ५) डब्लू,जे.दैठणकर

या आदेशात बदल्यातील क्रमांक १ ते ६ आणि ११ ते १४ यांनी उच्च न्यायालयासोबत सल्लामसलत करून आपल्याकडे असलेल्या पदभार सोडायचा आहे,असे लिहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *