महाराष्ट्रात 10 आयपीएस आले ; नांदेड शहर उपविभागात अनिल मस्के यांना नियुक्ती

सुरज गुरव सध्या बिनखात्याचे मंत्री 

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्रात सन 2019 ते 2021 दरम्यानच्या आयपीएस तुकडीमधील 10 आयपीएस अधिकाऱ्यांना उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. यात नांदेडमध्ये शहर विभागाचे पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव पदोन्नतीच्या प्रतिक्षेत असतांना त्यांची बदली आणि पदस्थापनाचे स्वतंत्र आदेश काढण्यात येतील असे लिहिले आहे. नांदेड शहर उपविभागात आयपीएस अधिकारी (तुकडीत 2021) चे अनिल रामदास मस्के यांना नियुक्ती देण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या गृहविभागाने सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी हैद्राबाद येथून सन 2019 ते 2021 च्या आयपीएस तुकडीमधील 10 अधिकाऱ्यांना महाराष्ट्र स्वंर्गात पाठविले आहे. त्या आधारावर महाराष्ट्र राज्याच्या गृहविभागाचे उपसचिव व्यंकटेश भट यांनी आज जारी केलेल्या आदेशानुसार अनिल रामदास मस्के-नांदेड शहर उपविभाग, कमलेश मिणा (2019) बीड जिल्ह्यातील केज उपविभाग, राहुल लक्ष्मण चव्हाण (सन 2020) वर्धा जिल्ह्याती पुलगाव उपविभाग, श्रीमती अन्नपुर्णासिंह (2020) जळगाव जिल्ह्यात चोपडा उपविभाग, श्रीमती नवमी दशरथ साटम (2021) चंद्रपुर जिल्ह्यात वरोरा उपविभाग, अनमोल मित्तल (2021) अकोला जिल्ह्यात अकोट उपविभाग, बडेली चंद्रकांत रेड्डी (2021) लातूर जिल्ह्यातील चाकूर उपविभाग, सुरज भाऊसाहेब गुजांळ(2021) नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील मालेगाव छावणी उपविभाग, चिलूबुला रणजनिकांत (2021) यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा उपविभाग, श्रीमती किरीपिका सी.एम.(2021) सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील अकलूज उपविभाग.

नांदेड शहर उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक सुरज पांडूरंग गुरव हे आपल्या अपर पोलीस अधिक्षक पदोन्नतीची वाट पाहत आहेत. पण त्यांना पदोन्नती मिळाली नाही आणि नवीन युक्ती सुध्दा देण्यात आलेली नाही. या आदेशात त्यांच्या बदलीचे आणि पदस्थापनेचे स्वतंत्र आदेश काढण्यात येतील असे लिहिले आहे. म्हणजे सुरज गुरव यांच्याकडे सध्या कोणतीही नियुक्ती नाही.

चित्रपट पाहुन त्यातील भाव समजण्याचा छंद आहे अनिल मस्के यांना
1964 तुकडीचे सेवानिवृत्त आयआयएस अधिकारी आणि इतर सदस्यांसमोर अनिल मस्के यांनी 38 मिनिटांची मुलाखत दिली होती. त्यात तुमची आवड असलेल्या चित्रपटांबद्दल सांगा असा प्रश्न विचारला असतांना अनिल मस्के यांनी शेरणी आणि थप्पड या चित्रपटांसह तीन-चार नावे घेतली. थप्पड या चित्रपटातील भावार्थ समजून सांगा असा प्रश्न विचारला असता अनिल मस्के म्हणाले होते. या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला स्वाभिमान आहे आणि त्याला त्याप्रमाणे जगण्याचा अधिकार थप्पड या चित्रपटात महिलांच्या जगण्यावर गदा आणली गेली. हा या चित्रपटाचा भावार्थ आहे. भारताचा वन कायदा 1971 मुळे महाराष्ट्र, छत्तीसगड, ओरीसा या राज्यांनी सर्वांत छान काम केले. भारताच्या एकूण भुभागापैकी 21.68 टक्के जागा वन विभागात आहे. वनविभागाचे एकूण क्षेत्रफळ 51 हजार चौरस मिटर आहे. तुझे वडील शेतकरी आहे काय असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी होकार दिला. चार एकर शेतीमध्ये किती लोक सुखी राहू शकतात याचा प्रश्नावर जोडून उद्योगिक विषय पण होता. तेंव्हा औद्योगिक क्षेत्रात जास्त कामगार लागतात, शेतीमध्ये कमी कामगार लागतात असे उत्तर अनिल मस्के यांनी दिले होते. तेंदु पत्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला तेंदुपत्यासाठी नियोजन केले तर त्यातून जास्त उत्पन्न मिळेल असे सांगितले. आपल्याला आठवणीत असलेल्या सर्व आकडेवारींचा सुंदर उपयोग करत अनिल मस्के यांनी आपल्या मुलाखतीत उत्तरे दिली. आजच्या देशातील परिस्थितीवर विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, गरीबी, आरोग्य आणि शिक्षणात जे नियम शासनाने केले ते उत्कृष्ट कार्य आहे असे म्हणाले. ओबीसी आणि एससी आरक्षणाबद्दल सुध्दा प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी सांगितले की, अनुसूचित जातीवर अन्यायाचा ईतिहास मोठा आहे म्हणून त्यांना आरक्षण मिळाले. ओबीसींना देण्यात आलेल्या आरक्षणाबद्दल अनिल मस्के सांगत होते की, त्यातील जातींच्या आर्थिक आधाराला प्रमाण मानुन त्यांना आरक्षण देण्यात आले आहे. ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट माहित आहे काय असा प्रश्न विचार असता त्यांनी मला याबद्दल काहीच माहित नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. भारताच्या प्रगतीमध्ये सोशल मिडीयाचा सुध्दा मोठा हात आहे. ज्यामुळे आपत्तीच्या काळात मोठी मदत होते, प्रशासन चालविण्यासाठी उपयोग होतो. शिक्षणात सुध्दा भरपूर उपयोग होतो. पण चुकीच्या माहिती पसरविण्याचा त्रास सुध्दा सोशल मिडीयामुळे होते असे सांगितले. प्रांतिक भाषा सर्वांनी शिकल्या तर त्यामुळे देशातील देशातील एकता वाढण्यास मदत होते. तसेच प्रांतिक भाषा जास्त प्रमाणात शिकल्या तर त्या व्यक्तीमध्ये व्यावसायिकता आपोआप येते. अनिल रामदास मस्के हे बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *