नांदेड(प्रतिनिधी)-महिन्याभरापुर्वीच्या भांडणाचा राग लक्षात घेवून 14 डिसेंबर रोजी एका युवकाला बळजबरीने चार चाकी वाहनात बसवून घेवून जाऊन चार जणांनी त्याला मारहाण केल्यानंतर इतवारा पोलीसांनी त्यातील तिघांना अटक केली आहे. आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने या तिघांना दोन दिवस, अर्थात 19 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.14 डिसेंबर रोजी दवाखान्यात जखमी अवस्थेत असलेल्या शेख ईलियास शेख आगामियॉ यांनी दिलेल्या जबाबाप्रमाणे तो अर्धापूरहून आपला ऍटो घेवून सकाळी 7 वाजता देगलूर नाका जवळील बरकत कॉम्प्लेक्स येथे आला. परंत अर्धापूरचे प्रवाशी घेवून जाण्यासाठी शोधा-शोध करत असतांना एम.एच.26 बी.ई.0520 या चार चाकी गाडीतून चार जण उतरले आणि त्यांनी मला जुन्या भांडणाचा राग काढून गाडीमध्ये मारत अज्ञात स्थळी नेले तेथे हॉकी स्टीकच्या सहाय्याने भरपूर मारहाण केली. जमखी अवस्थेत शेख ईलियासला हल्लेखोरच देगलूर नाका येथे घेवून आले. त्याच्यावर उपचार केला आणि त्या चौघांपैकी एकाने शेख ईलियासच्या वडीलांना फोन करून पण सांगितले. यावेळी ईलियासच्या डाव्या हाताला फॅक्चर झाले होते.
या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीसांनी गुन्हा क्रमांक 377/2023 भारतीय दंड संहितेच्या कलम 365, 326,324 आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला. पोलीस निरिक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनात शेख असद यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात आला.दि.16 डिसेंबर रोजी पोलीसांनी मोहम्मद अबरार मोहम्मद ईब्राहिम (24) रा.रजानगर ईतवारा नांदेड, राहुल राम कुरील (25) रा.रजानगर ईतववारा, शुभम किशन परदेशी (26) रा.गाडीपुरा ह.मु.शक्तीनगर नांदेड या तिघांना पकडले. आज पोलीस उपनिरिक्षक शेख असद, पोलीस अंमलदार रेवनाथ कोळनुरे, लक्ष्मण दासरवाड, मोहन हाके, हबीब चाऊस, अमोल भोकरे आदींनी या तिघांना न्यायालयात हजर केल्यानंतर पोलीस कोठडी मागितली तेंव्हा न्यायालयाने या दोघांना दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
एका युवकाला मारहाण करणाऱ्या तिघांना पोलीस कोठडी