नांदेडच्या पोलीस अंमलदाराचा मुंबई लोकल रेल्वेखाली मृत्यू

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदार आपल्या बहिणीला सोडण्यासाठी मुंबईला गेला आणि दुर्देवाने लोकलखाली येवून त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. याप्रकरणाने नांदेड जिल्हा पोलीस दलात शोककळा पसरली आहे.
नांदेड जिल्हा पोलीस दलात शिवराम श्रीपादराव शमदरे बकल नंबर 1378 हा युवक काल देवगिरी एक्सप्रेसने आपल्या बहिणीला घेवून मुंबईला गेला. मुंबई उपनगरात जाण्यासाठी त्याने बहिणीला बहिलांच्या डब्यात बसवले आणि पुढच्या डब्यात बसण्यासाठी तो गेला तेवढ्यात लोकल ट्रेन सुरू झाली लोकल ट्रेनची गती जलदगतीने वाढते आणि त्यातच काही घोळ झाला आणि शिवराम ट्रेनखाली आला. तो सध्या भोकरचे अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे यांच्याकडे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. पोलीस अंमलदार शिवराम शमदरेच्या मृत्यूमुळे नांदेड जिल्ह्याच्या पोलीस दलाने त्याला श्रध्दांजली व्यक्त केली असून शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *