वसमत(प्रतिनिधी)-येथील सिध्देश्र्वर देवस्थान लासिन मठ असून हे देवस्थान पुरातन आहे. या देवस्थानाची वसमत शहरात मोठ्या प्रमाणात जमीनी असून अनेक जमीनीवर अतिक्रमण करण्यात आल तर शासकीय कार्यालय उभारण्यात आले आहेत. असाच शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या जागेवर 1896 मध्ये शाळेसाठी दानपत्र करून दिले मात्र लासिन मठाच्या पुर्वजांच्या समाध्या सोडून 21 गुंठे जागेत अस करून देण्यात आल होत. मात्र प्रशासनाने ही 21 गुंठे जागाही अलीकडच्या काळात नोंदणीवरून उडवले. यामुळे मठाच्याच जमीनीवर अतिक्रमण केल्याचा प्रकार केला जात होता. येथील नागरीक आणि समाज बांधवांनी ते हाणून पाडला.
वसमत येथील बाभुळगाव रोड लगत असणाऱ्या सर्व्हे नंबर 140, 141 आणि 142 असा असून या सर्व्हे नंबरमध्ये 12 एकरच्यावर जमीन आहे. यातील काही जमीन जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी तत्कालीन लासिन मठाचे मठाधिपती कमळय्यागुरू करबसय्या शिवाचार्य यांनी शाळेच्या कामासाठी दानपत्र करून दिले. हे दानपत्र करून देत असतांना त्यांनी या मठातील पुर्वजांच्या समाध्या याच सर्व्हे नंबरमध्ये आहेत. 21 गुंठे जागा सोडून 12 एकर जागा शाळेच्या कामासाठी करून दिली. करून देत असतांना त्यांनी ही जागा शाळेच्या कामासाठीच वापरली जावी,इतर कामासाठी ती जागा वापरण्यात येणार नाही असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. मात्र कालांतराने या मोकळ्या जागेवर दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत गेल. कारण शहरातील वस्ती वाढत गेल्यामुळे अतिक्रमण वाढत गेल. याकडे ना शाळेने लक्ष दिली ना मठाने मात्र या ठिकाणच्या राजकीय पुढाऱ्यांनी मोकळ्याच्या जागेवर नजर ठेवून नको तो खटाटोप करण्याचा प्रयत्न अनेकदा केला आणि तो हाणूनही पाडला. सध्या विद्यमान आमदार नवघरे यांनी क्रिडा संकुलासाठी या जागेची निवड केली. निवड करतांना त्यांनी सर्वच जागा क्रिडा संकुलासाठी देण्यात यावी असे प्रशासनाकडे मागणी केली. पण पुर्वजांच्या समाध्या असल्यामुळे ही जागा कोणालाही देता येत नाही. हा धार्मिक परंपरेनुसारचा नियम आहे.
पुर्वजांच्या समाध्या दि.17 रोज रविवारी श्री.108 ष.ब्र.करबसव शिवाचार्य महाराज यांनी आणि श्री.108 ष.ब्र.गुरूपादेश्वर शिवाचार्य महाराज गिरगाव आणि थोरवा संस्थेचे मठाधिश महंत स्वामी यांच्या उपस्थितीत पुर्वजांच्या समाध्या शोधून काढल्या. यावेळी मोठ्या प्रमाणात समाज बांधव व वसमत शहरातील नागरीक उपस्थित होते. यांनी ही जागा केवळ मठाची असून मठासाठीच वापरण्यात यावी इतर कामासाठी कोणालाही देवू नये अशी मागणी यावेळी उपस्थित नागरीकांनी केली. याचबरोबर यापुर्वी या मठाच्या जागा अनेक कामासाठी शासनाने घेतल्या. मात्र आता ही जमीन कोणत्याही परिस्थितीत जाऊ दिली जाणार नाही असा पवित्र समाज बांधवांनी घेतला.
लिंगायत समाजाला मठ परंपरा आहे. ही मठे चालविण्यासाठी शेकडो एकर जमीनी दान दिल्या होत्या. याच जमीनींच्या उत्पन्नात आजपर्यंत ही मठे चालत आली आहेत आणि पुढेही चालत राहणार. शासनाने कोणत्याही प्रकारची मदत मठांना केली नाही. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नाच साधन म्हणून या जमीनी आहेत. यामुळे वसमत येथील ही जमीन देखील मठाचे उत्पन्नाचे साधन म्हणून वापरल जाणार आहे. आज लासिन मठाची अवस्था पाहिली तर पुर्ण जिर्ण अवस्थेत आहे. या मठाच्या विकासासाठी आजपर्यंत कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांनी पुढाकार घेतला नाही. पण मठाची संपत्ती लाठण्यासाठी मात्र पुढाकार घेत आहेत. ही शोकांतीका आहे आणि कोणत्याही परिस्थितीत जमीनी आता दिल्या जाणार नाहीत असा पवित्रा समाज बांधवांनी घेतला.
या जागेवर पुर्वजांच्या समाध्या शोधण्याच काम सुरू करत असतांना या समाध्या या ठिकाणी आढळून आल्या. समाधी ही काढता येत नाही. मात्र प्रशासनाच्या हट्टासामुळे समाध्या काढण्यात आल्या होत्या. या ठिकाणी श्री.108 ष.ब्र.करबसव शिवाचार्य महाराज यांनी आणि श्री.108 ष.ब्र.गुरूपादेश्वर शिवाचार्य महाराज गिरगाव आणि थोरवा संस्थेचे मठाधिश महंत स्वामी यांच्या उपस्थितीत विधीवत पुजा करण्यात आली.