लातूर,(विमाका)- वृध्दापकाळ चांगल्या प्रकारे घालवता यावा याकरिता शासनाने फेब्रुवारी 1963 मध्ये राज्यातील वृध्दांसाठी मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थामार्फत अनुदान तत्वावर वृध्दाश्रम चालविण्याची योजना सुरू केली. त्याचबरोबर खाजगी संस्थांमार्फत सुध्दा विनाअनुदानित वृध्दाश्रम कार्यरत आहेत. लातूर विभागातील लातूर, धाराशिव, नांदेड व हिंगोली जिल्ह्यांतील खाजगी विनाअनुदानित वृध्दाश्रमांनी त्यांच्या विविध मागण्यांबाबत शासनासोबत चर्चा (सहविचार) करण्याच्या अनुषंगाने संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहन येथील समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अ.र. देवसटवार यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.अधिक माहितीसाठी 02385-255378 या क्रमांकावर संपर्क साधावा.
Related Posts
सविता गायकवाडवरील फायरिंग प्रकरण ; स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक श्री.द्वारकादासजी चिखलीकर यांनी केला पर्दाफाश; बनावट फायरींग
नांदेड (प्रतिनिधी)-दि. 9 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता बाफना पुलावर माझ्यावर फायरिंग झाली अशी माहिती इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या…
‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचे १४ ते १८ डिसेंबर दरम्यान आयोजन
१४ डिसेंबर रोजी उद्घाटन ५ राज्यातील खेळाडू सहभाग घेणार नांदेड(प्रतिनिधी)-अखिल भारतीय विद्यापीठ संघ, नवी दिल्ली मार्फत पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ…
2013 मध्ये फौजदार परिक्षा उत्तीर्ण झालेले 247 पोलीस अंमलदार लवकरच पीएसआय होणार
नांदेड (प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाने सन 2013 मध्ये पोलीस उपनिरिक्षक पदाची परिक्षा उत्तीर्ण केलेल्या एकूण 244 पोलीस अंमलदारांना शासन निर्णयानुसार 25 टक्के…