नांदेड (प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या स्वागत कक्षामध्ये दि. २६ डिसेंबर रोजी वीर बाल दिन साजरा करण्यात आला. विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. माधुरी देशपांडे यांनी वीर बालक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, उपकुलसचिव रामदास पेदेवाड, अधिसभा सदस्य शिवाजी चांदणे, डॉ. लक्ष्मीकांत आगलावे, रामदास सोळंके, नारायण गोरे, मधुकर आळसे, रामदास खोकले, सुधाकर नागरे, कपिल हंबर्डे, शिवाजी कल्याणकर, खेमसिंग पुजारी, दिपक हंबर्डे, बबन हिंगे, बंकटसिंह ठाकूर यांच्यासह प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांनी वीर बालक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.