औंढा नागनाथ(प्रतिनिधी)-एका राशन दुकानदाराला पाठीशी घालण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील पुरवठा विभाग झोपेचे सोंग घेत असल्याबद्दलची तक्रार रिपब्लिकन युवा सेनेच्यावतीने तहसीलदार औंढा नागनाथ यांना देण्यात आले आहे.
मौजे आसोला, औंढा नागनाथ येथील राशन दुकानदार राखोंडे हे सर्वसामान्य माणसांचे, वंचितांचे राशन काळ्या बाजारात विक्री करत आहेत. काही गोर-गरीब आणि अनुसूचित जातीच्या लोकांची नावे जाणून-बुजून त्यांनी वगळली आहेत. तरी अन्न पुरवठा विभाग झोपेचे सोंग का घेत आहे असा प्रश्न निवेदनात उपस्थित केला आहे. पुरवठा अधिकारी यांच्या मार्फत योग्य चौकशी करून राखोंडे यांचा राशन दुकानाचा परवाना रद्द करण्यात यावा अन्यथा आम्ही संवैधानिक पध्दतीने व शांततेने आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत. शासनाने आम्हाला दिलेल्या राशन पासून वंचित ठेवणारे राशनदुकानदारा राखोंडे यांच्यावर फौजदारी खटला दाखल करून आम्हा वंचितांना न्याय द्यावा अशी विनंती करण्यात आली आहे. तहसीलदार औंढा नागनाथ यांनी आपल्या देखरेखीमध्ये गोर-गरीबांचे राशन वाटप करण्याची सोय करण्यात यावी अशीही विनंती करण्यात आली आहे. या निवेदनावर युवा सेना अध्यक्ष पंडीत सुर्यतळ, उपाध्यक्ष हितेश किर्तने, तालुकाध्यक्ष लक्ष्मण खंदारे, कोषाध्यक्ष बालाजी उर्फ बाळासाहेब खंदारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
राशनचे धान्य काळ्या बाजारात विकणाऱ्या दुकानदाराचा परवाना रद्द करा-रिपब्लिकन सेनेचे निवेदन