मध्यरात्री युवकाचा खून

नांदेड(प्रतिनिधी)-29 डिसेंबरच्या रात्री 1 ते 1.30 वाजेदरम्यान काही युवकांनी एका युवकाला जुन्या दुश्मनीच्या कारणातून जी.एन.बार, वसंतराव चव्हाण चौक येथे हल्ला करून त्याचा खून केला आहे.शिवाजीनगर पोलीसांनी अत्यंत प्रभावी कामगिरी करत त्यातील काही जणांना ताब्यात घेतले आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार व्यंकटी ओमकार बल्लमवार (28) या युवकावर रात्री 1 वाजेच्यासुमारास विविध हत्यारे सोबत घेवून शिवाजी चव्हाण, भगवान चव्हाण आणि त्यांच्या इतर साथीदारांनी हल्ला केला. या हल्यात व्यंकटी बल्लमवार जागीच मरण पावला. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, सहाय्यक पोलीस अधिक्षक किरितिका यांच्यासह शिवाजीनगरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक आश्रुबा घाटे, पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे असे अनेक अधिकारी आणि पोलीस अंमलदार घटनास्थळी दाखल झाले. अत्यंत प्रभावी कामगिरी करत शिवाजीनगर पोलीसांनी व्यंकटीच्या मारेकऱ्यांपैकी काही जणांना ताब्यात घेतले आहे. इतर कायदेशीर प्रक्रिया वृत्तलिहिपर्यंत पुर्ण झालेली नव्हती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *