नांदेड,(प्रतिनिधी)-विमानतळ पोलीसांनी चोरीच्या सहा दुचाकी गाड्या, 4 लाख 20 हजार रुपये किंमतीच्या एका चोरट्याकडून जप्त केल्या आहेत.
विमानतळ येथील प्रभारी पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक विजय जाधव यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरिक्षक जाधव, पोलीस अंमलदार दारासिंह राठोड, पठाण, जावेद, भिसे, कुलथे, डोईफोडे आदींनी विश्र्वास परमेश्र्वर शिंदे (21) रा.शारदानगर यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरलेल्या विविध कंपन्यांच्या सहा दुचाकी गाड्या किंमत 4 लाख 20 हजार रुपये असा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.सध्या हा आरोपी विश्र्वास परमेश्र्वर शिंदे हा पोलीस कोठडीत आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे, सहाय्यक पोलीस अधिक्षक किरितिका यांनी पोलीस ठाणे विमानतळचे पोलीस निरिक्षक नागनाथ आयलाने यांच्यासह दुचाक्या जप्त करणाऱ्या चोरट्याला पकडणाऱ्या पथकाचे कौतुक केले आहे.
विमानतळ पोलीसांनी 4 लाख 20 हजारांच्या चोरीच्या दुचाकी गाड्या पकडल्या