पतीने पत्नीचा गळा दाबून केला खून 

 

नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड तालुक्याती राजा दापका येथील गायकवाड कुटूंबिय हे मुखेड शहरात वास्तव्यास होते. अचानक या दोघांमध्ये वाद निर्माण झाला. यातील आरोपी पती भिमराव गोविंद गायकवाड याने स्वत:च्या पत्नीचा गळा दाबून खून केलयाची घटना 31 डिसेंबरच्या रात्री घडली. याबाबत मुखेड पोलीस ठाण्यात खून प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुखेड पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरिक्षक गजानन विजय आसापूरे (33) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन भिमराव गायकवाड यांच्याविरुध्द कलम 302 हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात मयत अश्विनी गायकवाड आणि आरोपीचा पती हे दोघेच घरात 31 डिसेंबरच्या रात्री झोपले असतांना मरण पावल्याची आढळून आली. याबाबत वैद्यकीय तपासणी केली असता तिचा मृत्यू गळादाबून झाल्याची माहिती समोर आली. यावरून मयत अश्र्विनी हीचा पती भिमराव गोविंदराव गायकवाड रा.दापका ह.मु.उपजिल्हा रुग्णालय येथे त्यांच्या राहत्या घरी ही घटना घडली. यावरून मुखेड पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक जाधव हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *