नांदेड़ (प्रतिनिधि)-योगेश्र्वराच्या राज्यात सर्वच 2 नंबरची कामे बंद असल्याची चर्चा सुरू आहे. परंतू आजच प्राप्त झालेल्या माहितीप्रमाणे भोकरफाट्याच्या कॅनॉल जवळ, ए-1 चहाचे दुकान याच्या पाठीमागे टेकाळे यांच्या शेतात हा जुगार अड्डा अत्यंत जोरात सुरू आहे. अशाच प्रकारे दुसरा जुगार अड्डा हदगाव ते उमरखेड रस्त्यावरील व्यंकटेश मंदिराच्या जवळ तेवढ्याच जोरदारपणे सुरू आहे.
आज प्राप्त झालेल्या जुगार अड्ड्याच्या माहितीनुसार जुगाऱ्यांना जुगाऱ्यांना सर्व सुविधा देवून हा जुगार अड्डा सुरू आहे, मग कोठे बंद आहे जुगार अड्डे, मटक्याचे जुगाराचा एका कागदावर पुर्ण शहराचा हिशोब लावलेला असतो. जुगार अड्ड्यांमुळे सागर यादवचा खून झाला होता. असे अनेक गुन्हे जुगारांच्या अड्ड्यांमुळेच घडतात. पण पोलीसांना काय कागदपत्रे तयार करणे काम आहे त्यांचे ते करतातच. अशा प्रकारे मोठ्या टेन्टमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्याच्या सुरक्षेसाठी चारही बाजूंनी जाळीदार कपडे लावलेले दिसतात. काही माणसे कोणी-कोणी या भागाकडे येत आहे काय? याची रेकी करत असतात.
असाच एक जुगार अड्डा हदगाव-उमरखेड रस्त्यावर पैशांचा देव व्यंकटेश्वर याच्या मंदिराशेजारी सुध्दा मोठ्या जोरदारपणे सुरूच आहे. काहीच अंतरावर नदी आहे आणि नदीच्या अर्ध्या भागानंतर यवतमाळ जिल्हा सुरू होतो. म्हणजे आपल्या जिल्ह्याच्या सगळ्यात शेवटच्या टोकावर सुध्दा मोठाच जुगार अड्डा सुरू आहे.
भोकरफाटा आणि हदगाव-उमरखेड रस्त्यावर जुगार अड्डे जोरात सुरू