नांदेड़ (प्रतिनिधि)-मनोज जरांगे यांनी सुरू केलेल आंदोलन फक्त राजकीय दृष्टीकोण ठेवून सुरू केल असेल तर मी सुध्दा त्याला ठिकच म्हणेल प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी केले.पण समाजासाठी असेल तर त्यासाठी तुमचे ताट वेगळे हवे आमच्या ताटातले काढून घेण्याचा प्रयत्न करू नका अशी जरांगे यांची समजूत बाळासाहेब आंबेडकरांनी काढली.
आज नरसी येथे आरक्षण बचाव महामेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात मेळावा अध्यक्ष म्हणून ऍड.बाळासाहेब आंबेडकर हे होते. याप्रसंगी इतर उपस्थितीतांमध्ये प्रकाशअण्णा शेंडगे यांच्यासह ओबीसीमधील विविध जातींचे विविध नेते उपस्थित होते. त्यामध्ये ऍड.सचिन नाईक, डॉ.बी.डी.चव्हाण, नागोराव पांचाळे, आर.डी.शिंदे, हरीभाऊ शेळके, डी.पी.मुंडे, चंद्रकांत बावकर, विष्णु जाधव, किशन चव्हाण, कल्याण दळे, विकास महात्मे, आनंदा चव्हाण, ऍड.अविनाश भोसीकर, महेंद्र देमगुंडे यांचा समावेश होता.

याप्रसंगी पुढे बोलतांना ऍड.बाळासाहेब आंबेडकर म्हणाले जनार्धन पाटील यांनी लिहिलेल्या पुस्तकातून ओबीसी हा नेमका घटक काय आहे आणि ओबीसी या घटकात किती जाती येतात याची यादीच वाचायला मिळते. मुळात मंडळ आयोग हा ओबीसीसाठी नव्हताच. तो अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणात वाढ करण्यासाठी होता. त्यावेळी दिल्लीमध्ये महिलांनी एक मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये आम्हाला आरक्षण नको आणि आरक्षण नवराही नको अशा पाट्या होत्या. या आंदोलनाला विरोध करण्यासाठी दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी एकजुट केली आणि गोसावी नावाच्या एका विद्यार्थ्यांला पुढे करून त्याच्या पायावर रॉकेल टाकून म्हणजे आपला विरोध पोहचले असे ठरले. पण त्या गोसावी नावाच्या विद्यार्थ्याने आपल्या पायावर रॉकेल टाकताच कोणी तरी मागून त्याला पुर्णपणे पेटवून दिली आणि तो 100 टक्के जळाला आणि मरण पावला. यामुळे सुध्दा देशात उठाव झाला होता. पण सरकारने आपण केलेला निर्णय परत कसा घ्यावा म्हणून लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेली रामरथ यात्रा पुढे आणण्यात आली आणि सरकार कोसळले.त्यानंतर मंडळ आयोगाचा वाद न्यायालयात गेला होता. न्यायालयाने सुध्दा सरकारने घेतलेला निर्णय योग्य असल्याचे मान्य केले होते. हा ईतिहास आहे. त्यावेळी दोन बाबी करायच्या राहिल्या. म्हणजे आरक्षणाच्या यादीत नाव आणणे आणि नाव काढणे. राज्य हे करू शकत नाही त्यासाठी वेगळी पध्दत आहे. म्हणून जरांगेला ओबीसी आरक्षणात स्थान मागता येणार नाही. सरकार कोणालाही जात देवू शकत नाही पण असलेली जात ही मागसवर्गीय आहे की,नाही हे सादरीकरण राज्य शासनाला करता येते मग तो निर्णय विधानसभेत मंजुर करून केंद्राला पाठवावा लागतो आणि केंद्र त्या जातीची दखल घेते आणि मग ते आरक्षणाच्या यादीत आणता येते.
आजच राजकीय नेतृत्व हे पुर्णपणे सडलेल आहे. त्यांनी आपल्या जातीलाही न्याय दिलेला नाही तर इतरांना ते काय देणार. त्यांनी आमची नेहमीच लुट केलेली आहे. मराठ्यांच्या नेत्यांनी मराठ्यांना न्याय दिला नाही आणि आमच्या नेत्यांनी आम्हाला न्याय दिला नाही अशा परिस्थितीत आजच नेतृत्व हे चोरांच नेतृत्व आहे असा उल्लेख ऍड.आंबेडकरांनी केला. यामध्ये मी आजही गरीब मराठ्यांना आरक्षण देण्याच्या पक्षाच्या आहे. कारण गावाचा विचार केला तर 2-4 एकरचे मालक शेतकऱ्यांची टक्केवारी 70 टक्के आहे. त्या 70 टक्यांमध्ये 50 टक्के मराठा समाजाचे व्यक्ती आहेत. त्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. शेतकऱ्यांच्या पिकाला सरकार हमी भाव देते परंतू बाजार समितीचे ठेकेदार हमी भावाने पिक खरेदी करत नाहीत अशा परिस्थितीत त्या ठेकेदारांना चुक केली तर पाच वर्षाची कैद द्यायला हवी. पण दे होवू शकत नाही. कारण हे सर्व ठेकेदार आमदार, खासदारांचे नातलग असतात.
पुढच्या निवडणुकांमध्ये आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्यांना मतदान देणे गरजे आहे कारण वेगवेळ्या पध्दतीने संविधान बदलाची प्रक्रिया हा बीजेपीचा आजेंडा आहे. संविधान बदलायच आहेच तर मला आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना विचारायच आहे की, संविधानात काय चुकलेले आहे ते सांगा ते आम्हा पटले तर आम्ही सुध्दा तुमच्या सोबत राहु नसता आम्ही सांगितलेले बरोबर असेल तर तुम्ही आमच्या सोबत राहा आणि संविधान बदलू नका. पण बाराबलुतेरांना सत्ता द्यावी हा मुळ त्यातील मुद्या आहे. ज्यामुळे संविधान बदलाची प्रक्रिया हा बीजेपीचा अजेंडा आहे.
काल परवाच देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही 25 हजार प्राथमिक शाळा बंद करणार आहोत. म्हणजे काय होईल तर खाजगी शाळा वाढतील आणि त्यातील 50-60 हजार फिस आम्ही देवू शकणार नाही. छत्रपती शाहु महाराजांनी शिक्षण हे सर्वांसाठी आवश्यक आहे असे सांगितले होते. म्हणजे शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे जो पिईल तो गुरगुरणारच. आरक्षणमुळे झालेल्या बदलात आम्हाला ती जागा मिळाली ती जागा आमच्यासाठी कधीच मोकळी नव्हती. आम्ही तेथे पोहचलो तेंव्हा आम्हाला कळायला लागले काय घडते, कसे घडते, निर्णय कसे होता आणि हे आम्हाला कळायला लागले ते परत आमच्याकडून काढून घेण्याची तयारी सुरू झाली आहे. आजच्या नेतृत्वाला आपले उंबरठे झिजवणारा समुह हवा आहे. पण मी अशी व्यवस्था आणणार आहे की, देशातील सर्व सामान्य नागरीक ताठ मानेने जगला पाहिजे म्हणून आता ओबीसीच्या हातात सत्ता होईल तरच हे होवू शकते.
काही लोक सांगतात दंगली होतील आम्हाला दंगली नको आहेत आम्ही आंदोलन, मोर्चे याद्वारेच पुढे जाणार आहोत. तुम्ही सर्व एकजुटीने ओबीसी उमेदवाराला मतदान करा तेंव्हा आपण दंगलीशिवाय राज्य बदलू शकते हे दाखवून देऊ. दंगलीमध्ये कोण्या आमदाराचा,कोण्या खासदाराचा मुलगा येतो का? तेंव्हा तुमच्यासमोर दंगलीचा विषय आलाच तर तेंव्हा तुम्ही त्याला सांगा की, तुझ्या मुलाला अगोदर बोलव आम्ही सर्व त्याच्या पाठीमागे उभे राहू. नरेंद्र मोदीने 22 जानेवारी रोजी दिवाळी साजरी करण्यास सांगितले आहे. आम्ही जरूर दिवाळी साजरी करू आमच्या लेकरांच्या जेवनातील 500 रुपये खर्च का करावे. मोदींनी आम्हाला प्रत्येकी 500 रुपये दिले तर आम्ही नक्कीच दिवाळी साजरी करू.
येत्या निवडणुकांमध्ये मतदारांनी कबाब, शबाब आणि महात्मा गांधी यांना स्वत:पासून वर्जित ठेवले तर नैतिकता असलेलाच राजकारणी निवडुण येईल. कारण कबाब, शबाब आणि महात्मा गांधी ही आमची निवडणुकीमध्ये पुर्ण होणारी गरज आम्ही स्वत: करण्याची ताकत ठेवतो. त्यामुळे राजकीय लोकांपासून हे घेण्यापेक्षा आपली स्वत:ची तयारी ठेवा. संविधान टिकले तरच आरक्षण टिकेल आणि येत्या निवडणुकीमध्ये संविधान टिकविण्यासाठीच मतदान करा.
नांदेडचे आमदार आणि खासदार ऍड.बाळासाहेब म्हणतील तोच होईल-प्रकाश अण्णा शेंडगे

याप्रसंगी प्रकाश अण्णा शेंडगे म्हणाले नांदेडचा खासदार बाळासाहेब आंबेडकर म्हणतील तोच होईल, आंबेडकर म्हणतील तेच आमदार होतील असे स्वत:च्या मनात ठरवा आणि आपली ताकत मतपेटीतून दाखवा. आपलाच राजा मतदान पेटीतून बाहेर आणण्याची ताकत तुमच्यात आहे ते दाखवून द्या. सर्व कारणखाने, शिक्षण संस्था कोणाकडे आहेत. आपण आता त्याचे मालक होवू असे प्रयत्न करा.10-12 टक्के मराठे आंदोलन करतात तर 60 टक्के ओबीसी आंदोलन करणार नाहीत काय असा प्रश्न उपस्थित करून प्रकाश अण्णा शेंडगे यांनी सांगितले की, येत्या 20 जानेवारी रोजी मुंबई येथे डुकर, मेंढ्या, शेळ्या आदी जनावरांसह आंदोलन करणार आहोत. या आंदोलनाला सुध्दा यशस्वी करा आणि आपल्या हक्काचे कोणी हिरावणार नाही यासाठी सदैव जागृत राहा.