समाज माध्यमांवर खोट्या ऑडीओ क्लिप पसरवू नका-श्रीकृष्ण कोकाटे

नांदेड(प्रतिनिधी)-रस्ता अपघातातील कायद्यामध्ये झालेल्या बदलाबाबत 9 जानेवारी रोजी मध्यरात्रीपासून वाहन चालक व मालक संघटना बेमुदत संपावर जाणार अशी ऑडीओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे पण असे काही नाही ही बनावट ऑडीओ क्लिप आहे असा खुलासाचा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिला आहे. असा बनावटपणा कोणी करेल तर त्याच्याविरुध्द कडक कायदेशीर कार्यवाही करू असा इशाराही पोलीस अधिक्षकांनी दिला आहे.
भारतीय दंड संहितेच्या अपघात या सदरातील अपघातात ट्रक चालक अपघात घडल्यानंतर जखमीला मदत करण्याऐवजी पळून जाणार असेल तर त्याला 10 वर्षाची शिक्षा होईल ही सुधारणा करण्यात आली. त्यानंतर देशभर आंदोलन झाले आणि सध्या हा विषय स्थगित आहे. पण नांदेड जिल्ह्यामध्ये एक खोटी व बनावट ऑडीओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये 9 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून वाहन चालक व मालक संघटना बेमुदत संपावर जाणार आहेत आणि नांदेड जिल्ह्यात एका एस.टी. चालकाला अटक झाल्याची माहिती त्या ऑडीओ क्लिपमध्ये व्हायरल केलेली आहे.
नांदेड जिल्ह्यात कोणत्याही एस.टी. चालकाला अटक झालेली नाही. याबाबत चालक-मालक संघटनांशी चर्चा करण्यात आली त्यांनी आम्ही असा कोणताही बेमुदत संप करणार नसल्याचा खुलासा केलेला आहे. त्यामुळे अशी बनावट क्लिप पसरवून अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीवर विश्र्वास ठेवू नका आणि पुढे जर कोणी अशी बनावट ऑडीओ, व्हिडीओ क्लिप बनवले आणि समाज माध्यमांवर आपण पाहिली तर जनतेने पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती द्यावी असा खोडसाळ पणा करणाऱ्यांविरुध्द नांदेड पोलीस विभाग कार्यवाही करेल असे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी कळवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *