नांदेड़ (प्रतिनिधि)-आरोपी सांगतो की मला माझ्या आईने पिस्तुल आणायला पैसे दिले म्हणून त्या मुलासह आईला आरोपी करण्यात आल्याचा प्रकार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात घडला.नांदेड जिल्हा न्यायालयाने आईला सध्या अंतिरिम अटकपुर्व जामीन मंजुर केला आहे.
दि.31 डिसेंबर रोजी नांदेड ग्रामीणचे पोलीस उपनिरिक्षक आनंद मारोती बिचेवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते त्यांच्या सोबत सहाय्यक पोलीस निरिक्षक जगताप, पोलीस उपनिरिक्षक महेश कोरे, पोलीस अंमलदार संतोष जाधव, शेख सत्तार, संतोष बेल्लूरोड हे गस्त करत असतांना त्यांनी विवेक विद्यासागर गजभारे (18) रा.वसरणी या युवकास सोबत घेवून पंचासमक्ष त्याच्या घराची घर झडती घेतली. त्याच्या घरात एक पिस्तुल (गावठी कट्टा), एक मॅक्झीन आणि एक जिवंत काडतूस सापडले. गावठी पिस्तुल बाळगण्याचा उद्देश विवेक गजभारेला विचारल्यावर माझ्या आईनेच मला पिस्तुल आणण्यासाठी पैसे दिले होते असे सांगितले असा उल्लेख पोलीस प्राथमिकीमध्ये आनंद बिचेवार यांनी केला. पण त्यावेळी आई घरात सापडली नाही असे तक्रारीत लिहिले आहे. त्याप्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात विवेक आणि त्याची आई यांच्याविरुध्द भारतीय हत्यार कायद्याच्या कलमानुसार गुन्हा क्रमांक 914/2023 दाखल करण्यात आला.
या संदर्भाने नांदेड जिल्हा न्यायालयात ऍड.सुमंत लाठकर यांनी त्या आईला अटकपुर्व जामीन मिळावा म्हणून जामीन अर्ज क्रमांक 18/2024 दाखल केला. घटनेतील एफआयआर पाहिल्यानंतर न्यायाधीश आर.आर.पटवारी यांनी त्या आईला अटकपुर्व अंतरिम जामीन दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 16 जानेवारी रोजी होणार आहे.
गावठी पिस्तुल प्रकरणात महिलेला अटकपुर्व अंतरिम जामीन