नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेला वेळूच्या काठीने मारहाण करून त्यांच्या कानातील सोन्याच्या काढ्या आणि गळ्यातील मनी मंगळसुत्र बळजबरीने चोरण्यात आले आहेत. कंधार येथे एक दुकान फोडून चोरट्यांनी काजू-बदाम चोरले आहेत. किनवट येथे एक मोबाईल चोरीला गेला आहे आणि सोनखेड येथून मोटारसायकल चोरीला गेली आहे. या चार चोरी प्रकारांमध्ये एकूण 70 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे.
सुलोचना रामराव क्षीरसागर या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार 22 जून रोजी सकाळी 8.30 ते 23 जूनच्या पहाटे 3 वाजेदरम्यान हा प्रकार ज्योती टॉकीज रस्त्यावरील यामहा शोरुमजवळ त्यांना नेहरु शॅर्ट आणि पांढरे धोतर घातलेला 50 वर्षीय माणुस आणि त्याच्या सोबत एक महिला लालसर नवार लुगडे घातलेली 45 वर्षाची असे दोघे भेटले त्यांनी तिला सोबत घेवून आलेगाव येथील वैद्याकडून मोफत उपचार करून देतो म्हणून प्रथम ऍटोने आणि नंतर लक्झरी बसने आलेगाव येथे नेले तेथे बालाजी गजभारे यांच्या शेतात नेऊन तिला वेळूच्या काठीने मारहाण करून त्यांच्या कानातील सोन्याच्या काढ्या व मनी मंगळसुत्र 25 हजार रुपये किंमतीचे बळजबरीने चोरून नेले आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा 21 जुलै रोजी दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे हे अधिक तपास करीत आहेत.
सय्यद महेमुद अल्लाबक्ष यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मौ.कुरूळा ता.कंधार येथील त्यांचे दुकान 20 जुलै रोजी बंद करुन ते घरी गेले.21 जुलैच्या पहाटे कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या दुकानावरील पत्रे बाजूला करून त्यातून काजू, बदाम, सिगरेट पॉकीट आणि रोख रक्कम असा 23 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. कंधार पोलीसांनी हा गुन्हा केला असून पोलीस अंमलदार सुनिल पत्रे अधिक तपास करीत आहेत.
किनवट येथील कृष्णा मोबाईल गॅलरीचे मालक अमोल विष्णुकांत हेळगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 21 जुलै रोजी दुपारी 3.40 वाजता ते आपल्या दुकानात बसले असतांना त्या दुकानात आलेल्या एका व्यक्तीने त्यांच्या दुकानातील 17 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरुन नेला आहे. या प्रकरणी किनवट पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस अंमलदार कोलबुध्दे हे करीत आहेत.
सोनखेड जवळील पेनुर-लोहा रस्त्यावर कामराजी धारवा संबोड यांनी 20 जुलै रोजी दुपारी 12.30 वाजता आपली दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 झेड 7414 ही 15 हजार रुपये किंमतीची गाडी उभी केली. 2 तासात ही गाडी मारोती मंदिराजवळून चोरीला गेली. सोनखेड पोलीसंानी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार साखरे अधिक तपास करीत आहेत.
महिलेला वेळूच्या काठीने मारहाण करून 25 हजारांचा ऐवज लुटला