नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाच्या द्विवार्षिय निवडणुकीत यंदा परिवर्तन पॅनलचा विजय जवळपास सुनिश्चित दिसतो आहे. या निवडणुकीत 1820 मतदारांवर परिवर्तनाची जबाबदारी आहे. या निवडणुकीचे मतदार 12 जानेवारी रोजी होणार आहे.
सध्या नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाची निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून तीन वेगवेगळे पॅनल या निवडणुकीत आपला प्रचार करत आहेत. त्यामध्ये ऍड.जगजीवन भेदे यांच्या नेतृत्व परिवर्तन पॅनल, ऍड.आशिष गोदमगावकर यांचे समता एकता पॅनल आणि ऍड.राहुल कुलकर्णी यांचे जनशक्ती पॅनल असे एकूण तीन पॅनल आपली ताकत आजमावत आहेत. या पॅनलच्या विजयाची धुरा मुळात 1820 मतदारांवर आहे. या निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या पध्दतीने प्रचार सुरू आहे. त्या पध्दतींची चर्चा आता जिल्हाभर झाली आहे.
परंतू ऍड.जगजीवन भेदे यांच्या परिवर्तन पॅनलची धुरा सांभाळतांना त्यांनी कोणतेही प्रलोभन न देता अत्यंत संयमी पणे आपली उभारणी हळूहळू पुढे नेली आहे. परिवर्तन पॅनलच्या सोबत अनेक वकील महिला व पुरूष मेहनत घेत आहेत. या पॅनलमध्ये अध्यक्ष ऍड.जगजीवन भेदे, उपाध्यक्ष ऍड.मोहम्मद अखमलोद्दीन (मोहम्मद अरशद), सहसचिव पदाचे उमेदवार ऍड.सुभाष बंडे, कोषाध्यक्ष पदाचे उमेदवार ऍड.दिलीप गंगातिर व विशिष्ट सहाय्यक पदाच्या उमेदवार ऍड.टी.एच.रतन हे भरपूर मेहनत घेत आहेत. कोरोना सारख्या महामारीमध्ये ऍड.जगजीवन भेदे हे वकील संघाचे उपाध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी केलेले काम कोणी विसरणार नाही. यामुळे परिवर्तन पॅनलला नक्कीच फायदा होईल असे जानकारांचे मत आहे. चर्चा करतांना न्यायालय परिसरात वकील मंडळी चर्चा करत आहेत की, ऍड.आशिष गोदमगावकर आणि राहुल कुलकर्णी हे एकमेकांना तुल्यबळ आव्हान देत आहेत. पण बाकीचे सर्व विसरा दोघात तिसरा असे सुचक बोल ऐकावयास मिळत आहेत. एकंदरीत परिस्थिती ऍड.जगजीवन भेदे यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनलला वकील संघाच्या निवडणुकीत बहुमताने विजय मिळेल असे दिसत आहे.
