नांदेड(प्रतिनिधी)-दाभड फाटा येथे एका हॉटेलमध्ये अर्धापूर पोलीसांनी 9 एमएमचा देशी कट्टा पकडला आहे. एका व्यक्तीविरुध्द याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
20 जुलै रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्यासुमारास अर्धापूरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रामकिशन नांदगावकर यांनी दाभड फाट्यावरील सृष्टी हॉटेलची तपासणी केली तेंव्हा त्या ठिकाणी एका अलमारीमध्ये देशी बनावटीचा 9 एमएमचा कट्टा सापडला. या संदर्भाने रामकिशन नांदगावकर यांच्या तक्रारीवरुन परविंदरसिंघ परमजितसिंघ रामगडीया या विरुध्द भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 3/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक सुरवसे हे करत आहेत.
दाभड फाटा येथे एका हॉटेलात सापडला देशी कट्टा