नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड अभिवक्ता संघाच्या निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात वकील व्यवसाय करणाऱ्यांपेक्षा इतर ठिकाणच्या वकीलांची नावे जास्त प्रमाणात मतदार म्हणून जोडण्यात आली आहेत. यामुळे डेमोक्रसीची मॉकरी झाल्याचा आरोप अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ऍड.सतिश पुंड आणि ऍड नितीन कागणे यांनी केला आहे.यामुळे ऍडव्हकेट कायद्याच्या कलम 35 प्रमाणे शिस्तभंगाची कार्यवाही सुध्दा प्रस्तावित करण्यात येईल असे सांगण्यात आले.
नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाची निवडणुक द्वैवार्षीक असते. यंदाची निवडणूक सन 2024-2026 या कालावधीसाठी होत आहे. या निवडणुकीमध्ये मतदार नोंदणी करतांना प्रत्येक वकील सदस्याने आपल्या दोन वर्षाची फिस स्वत: भरायची असते. परंतू काही लोकांनी यात घोळ केला असून अनेकांची फिस एकाच व्यक्तीने भरल्याचे निदर्शनास येत आहे. नांदेड जिल्ह्यात वकीली व्यवसाय करणाऱ्या लोकांचीच नावे या निवडणुकीत नोंदणी होणे आवश्यक असतांना अनेक जणांच्या बोगस नोंदी मतदार म्हणून निवडणुकीत झाल्या आहेत. बार कॉन्सील ऑफ महाराष्ट्र ऍन्ड गोवा यांनी एक वकील संघ एक मतदार अशी निती तयार केली. त्यास सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने सुध्दा मंजुर केलेले आहे. त्यामुळे वन बार वन वोट या तत्वाचे उल्लंघन करून ही निवडणुक प्रक्रिया सुरू आहे. मतदान टक्का वाढवा आणि तो आपल्या दिशेने यावा म्हणून असे करण्यात आल्याचे दिसते. काही वकील मंडळी पुर्णवेळ वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करतात त्यांची नावे सुध्दा या मतदान प्रक्रियेत नोंदविण्यात आली आहेत. त्यामुळे यंदाचा एकूण मतदार आकडा 1820 झाला आहे. दरवर्षी हा आकडा वाढलाच पाहिजे पण यंदा जरा जास्तच वाढला आहे. वन बार वन वोट या नियमाचे उल्लंघन झाले तर ऍडव्हकेट कायदा कलम 35 नुसार शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येते.
असे झाले असेल तरी दि.12 जानेवारी रोजी या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पुर्ण होणार आहे. त्या प्रक्रियेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर होणार आहे.त्यामुळे नांदेड जिल्ह्यात वकीली व्यवसाय करणाऱ्या पैकी नवीन किती जण आले हे नक्कीच दिसेल. ग्राम पंचायतसारखे गाड्या भरून मतदार येतील आणि मतदान होईल असे चित्र यंदाच्या अभिवक्ता संघ निवडणुकीत दिसणार आहे. या संदर्भाने ज्या नवीन लोकांची मतदार म्हणून नोंद झाली त्यांच्याशी संपर्क केला असतांना काही जणांना आम्हाला मतदार म्हणून नोंद केली गेली याची माहिती सुध्दा नाही.याचा अर्थ असाही होतो की निवडणुकीमध्ये मतदार अर्ज भरतांना त्या अर्जावर स्वाक्षरी सुध्दा बनावटच असेल म्हणजे हा प्रकार 420 मध्ये मोडतो असे ऍड.सतिश पुंड आणि ऍड.नितीन कागणे यांनी सांगितले. जगात एकच व्यवसाय वकीली आहे ज्याला नोबल प्रोफेशन असे संबोधन आहे. ऍड.सतिश पुंड आणि ऍड.नितीन कागणे यांनी सांगितलेल्या बाबीचा विचार केला तर नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाच्या निवडणुकीत नोबेलिटी कुठे उरली आहे असे लिहिले तर चुक ठरणार नाही.
नांदेड अभिवक्ता संघाच्या निवडणुकीत डेमोक्रेसीची मॉकरी झाली