नांदेड(प्रतिनिधी)-7 जानेवारी रोजी पहाटेच्या 4 ते 5 वाजेदरम्यान वसंतनगर भागात रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या 8 कार दगडांनी फोडून नुकसान करणाऱ्या दोन गुन्हेगारांना शिवाजीनगर पोलीसांनी 48 तासांच्या आत गजाआड करत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या दोघांमधील एक विधीसंघर्षग्रस्त बालक आहे.
7 जानेवारी रोजी वसंतनगर भागात दोन जण दुचाकीवर गाडीवर आले आणि रोडच्या बाजूला उभ्या असलेल्या वेगवेगळ्या कंपनीच्या 8 चार चाकी गाड्या दगडांनी फोडून नुकसान केले. त्यावेळी संतोष सदाशिवराव कदम त्यांना सांगत होते की, असे करू नका तेंव्हा त्यांनी संतोष कदमवर दगडफेक करून जिवे मारण्याची धमकी देवून पळून गेले.
वसंतनगरकडे येणाऱ्या-जाणाऱ्या रस्त्यांवरील अनेक सीसीटीव्ही फुटेजची बारकाईकाने तपासणी करून शिवाजीनगर पोलीसांनी तिरुपती श्रीराम येवलेे(19) रा.अटाळा ता.धर्माबाद जि.नांदेड आणि त्याच्यासोबत एक विधीसंघर्षग्रस्त बालक अशा दोघांना पकडून गुन्हा क्रमांक 9/2024 उघडकीस आणला. 48 तासाच्या आत ही गुन्हेगार मंडळी गजाआड करुन शिवाजीनगर पोलीसांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, सहाय्यक पोलीस अधिक्षक किरितिका यांनी शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक मोहन भोसले, गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे, पोलीस अंमलदार रविशंकर बामणे, देवसिंग सिंगल, शेख अजहर, लिंबाजी राठोड, दत्ता वडजे यांचे कौतुक केले आहे.
वसंतनगर भागात चार चाकी गाड्या फोडणाऱ्या दोघांना शिवाजीनगर पोलीसांनी केले जेरबंद