नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त राज्यभरात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अनुशंगानेच नांदेड येथील भावसार चौकातील शिवपार्वती मंगल कार्यालयातील नांदेड उत्तरच्यावतीने संपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
शिवसेनेचे तालुका संघटक नवनाथ काकडे यांच्यावतीने नांदेड, हिंगोली, बीड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आनंदाराव जाधव यांचा सत्कार करण्यात आला. नांदेड, उत्तर मतदार संघातील वाडी बु येथे उपविभागीय दवाखाना उपलब्ध करून दिल्याबद्दल आ.बालाजी कल्याणकर यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात महानगरप्रमुख अशोक उमरेकर, शहरप्रमुख सचिन किसवे, तालुकाप्रमुख जयवंतराव कदम, शाम पावडे, संतोष बारसावडे, धनंजय पावडे, पिंटू भोसले यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
भावसार चौकात शिवसंपर्क अभियान कार्यक्रम संपन्न