माळेगाव येथे उद्या कुस्त्यांची प्रचंड दंंगल

श्रीक्षेत्र माळेगाव मीडिया सेंटर- श्रीक्षेत्र माळेगाव येथे जिल्हा परिषदेच्या वतीने विविध कार्यक्रम घेतले जात असून, उद्या शुक्रवार दिनांक 12 जानेवारी रोजी भव्य कुस्त्यांची दंगल होणार आहे. आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते कुस्त्यांच्या दंगलीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी विशेष उपस्थिती म्हणून खासदार सुधाकरराव शृंगारे यांची उपस्थिती राहणार आहे.
       आमदार भीमराव केराम, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय लकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षीक अभियंता प्रशांत कोरे, महावितरणचे अधीक्षक अभियंता गोकुळ जाधव, राष्ट्रीय महामार्गचे अधीक्षक अभियंता सागर तायडे, बीएसएनएलचे जिल्हा व्यवस्थापक प्रदीप चंदनवीर, कंधारचे उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक व लोह्याचे तहसीलदार शंकर लाड यांची प्रमुख राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *