नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक कार्यालयात आज राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करतांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेब आणि स्वामी विवेकानंद यांना पुष्पअर्पण करून अभिवादन केले.
आज 12 जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊ मॉं साहेब आणि स्वामी विवेकांनद यांची जयंती पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जनसंपर्क अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी लष्करे यांच्यासह अनेक अधिकारी आणि अनेक पोलीस अंमलदार तसेच मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी यांनी अभिवादन करून आपले श्रध्दाअर्पण केली. या कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सुर्यभान कागणे यांनी केले.
पोलीस अधिक्षक कार्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ मॉं साहेब आणि स्वामी विवेकांनद जयंती साजरी