नांदेड(प्रतिनिधी)- दि. 9 जानेवारी रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास भिमाशंकर पेट्रोल लोहा येथील व्यवस्थापक नागरगोजे हे पंपावरील 4 लाख 91 हजार रूपये घेऊन जात असताना त्यांना मोटारसायकलवरून खाली पाडून लूट करण्यात आली. या दरोडेखोरांना नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने आज पडकले असून पुढील तपासासाठी लोहा पोलीस ठाण्यात पाठविण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी संागितले.
आज बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सहायक पोलीस निरीक्षक पांडूरंग माने, संतोष शेकटे, पोलीस उपनिरीक्षक दशरथ आडे यांची उपस्थिती होती.
या प्रसंगाची माहिती सांगताना घडलेला प्रकार हा पेट्रोल पंपावर काम करणारा युवक पृथ्वीराज राजुसिंह ठाकूर (20) याच्या टीप देण्यामुळे झाला. त्याला टीप देण्यासाठी दरोडेखारे त्याला 70 हजार रूपये देणार होते. या प्रकरणी पोलिसांनी प्रताप बालाजी लाड (24) रा. सायाळा रोड लोहा, विशाल सुरेश जाधव (22) रा. लोहा, निखील मनोहर टेकाळे (24) रा. मन्सूर खान हवेली चौफाळा, नांदेड या आरोपींकडून पोलिसांनी प्रताप लाड 1 लाख रूपये, विशाल जाधव 50 हजार, निखील टेकाळे 50 हजार असे 2 लाख रूपये जप्त केले आहेत. पकडलेल्या चार जणांना पुढील तपासासाठी लोहा पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, डॉ. खंडेराव धरणे आदींनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सहायक पोलीस निरीक्षक पांडूरंग माने, पोलीस उपनिरीक्षक गजानन दळवी, पोलीस अंमलदार गंगाधर कदम, सुरेश घुगे, मोतीराम पवार, मारोती मोरे, गजानन बैनवाड, विठ्ठल शेळके, राजू सिटीकर, दीपक ओढणे, अर्जुन शिंदे, मारोती मुंडे यांचे कौतुक केले आहे.