नांदेड (प्रतिनिधी)- नोव्हेंबर 2023 पासून गायब झालेल्या एका व्यक्तीचे प्रेत आज सकाळी स्थानिक गुन्हे शाखेने गोदावरी नदी पात्रातून शोधून काढले आणि त्यास मारून नदीत फेकणाऱ्या पाच जणांना गजाआड केल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली.
नोव्हेंेबर 2023 मध्ये अजीज खान शादुल खान याने आपला भाऊ जमीर खान शादुल खान पठाण हरवल्याची खबर पोलीस ठाणे कुंटूर येथे दिली होती. त्यानंतर त्या प्रकरणाचा तपास काहीच झाला नाही, तेव्हा शादुल खान पोलीस अधीक्षकांना भेटले आणि अर्ज दिला. त्या अर्जानुसारची तपासणी स्थानिक गुन्हा शाखेने करून त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक सचिन सोनवणे आणि सहकाऱ्यांनी याची माहिती जमवून चक्रधर शिंदे, प्रथमेश पंपलवाड, पवन माधनवाड, माधव राठोड आणि गोविंद रेडेवार यांना ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा या पाच जणांनी नोव्हेंबरमध्येच जमीर खान शादुल खान पठाणचा खून करून त्याचे पे्रत त्याच्याच दुचाकीला तारने बांधून कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रात फेकून दिले होते.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार गोदावरी नदीपात्रात पोहण्यात तेरबेज असलेल्या लोकांच्या मदतीने दुचाकीला बांधलेला मृतदेह बाहेर काढला. त्याचे आज डोके दिसत नाही, अशी खात्रीलायक माहिती आहे, परंतु इतर सर्व शरीर शाबीत आहे. त्या संदर्भाने वैद्यकीय अहवाल आल्यानंतर जमीर खानचा खून कसा करण्यात आला हे कळेल असे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले.
माहिती घेऊन बातम्या छापा
आज या जमीर खान मृत्यू प्रकरणाबद्दल कोणतीही माहिती नसताना, त्याला काही आधार नसताना काही प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या बातम्यांवर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी नाराजी व्यक्त करत आपल्याकडे माहितीबद्दलचा पुरावा उपलब्ध असेल तरच त्याबद्दलची माहिती प्रसारित करा, असे सांगितले. मयत जमीर खान हा सामाजिक कार्यकर्ता होता, असे काही पुरावे उपलब्ध नाहीत, मारेकरी हे रेतीमाफिया आहेत याचीही काही माहिती नाही, परंतु या मारेकऱ्यांविरूद्ध सोयाबीन चोरीचा एक गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कोकाटे यांनी दिली.
पोलीस ठाणे सोनखेडच्या हद्दीत हरसद येथे खून
हरसद येथे कामगारांच्या एका गटात काही कारणावरून वाद झाला आणि एका कामगाराने दुसऱ्या कामगाराला लोखंडी रॉडने मारून त्याचा खून केला. याबाबतची माहिती सांगताना पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे म्हणाले या प्रकरणातील आरोपीला आम्ही