नांदेड (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले )पक्षाचा नांदेड जिल्हा मेळावा 16 जानेवारी 2024 रोजी दुपारी 2 वा. मुखेड येथील जिल्हा परिषद मुलींच्या शाळेचे मैदान येथे आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून या मेळाव्याचे उद्घाटक म्हणून मुखेडचे आमदार तुषार राठोड तर मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक दलितमित्र विजयदादा सोनवणे राहणार आहेत.
विशेष अतिथी म्हणून नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर,रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजा सरोदे,नायगावचे आमदार राजेश पवार, पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम, महाराष्ट्र प्रदेश सचिव चंद्रकांत चिकटे, माजी आमदार सुभाष साबणे,रिपाई युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, मराठवाडा प्रदेशाध्यक्ष मिलिंद शेळके,भाजपा नांदेड (दक्षिण)जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, माजी नगराध्यक्ष गंगाधर राठोड, खुशाल पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱ असुन या मेळाव्यास जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे नांदेड (दक्षिण )जिल्हाध्यक्ष गौतम काळे, नांदेड (उत्तर )जिल्हाध्यक्ष मिलिंद शिरढोणकर, मराठवाडा प्रदेश सचिव बालाजी धनसरे, नांदेडमहानगर जिल्हाध्यक्ष धम्मपाल धुताडे, चंद्रकांत ठाणेकर,नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष सचिन सांगवीकर, शिवाजी भालेराव, जिल्हा सरचिटणीस संजय भालेराव,नांदेड महानगर जिल्हाकार्याध्यक्ष मोहन आसोरे, महानगर सरचिटणीस प्रतिक सोनवणे, संजय जिल्हा सचिव रामा चिंतोरे, धर्माजी सावते, शुभम मादसवार, प्रशांत कांबळे, शुभम गजभारे, अँड.प्रकाश ठाणेकर, जयभिम पाटील,विवेक ओंकार, चंद्रकांत सोनकांबळे,गोवर्धन पवार, गंगाधर गायकवाड, सुरेश महाबळे, प्रभाकर बामणे, तुळशीराम भुरे,अनिल कांबळे यांनी केले आहे.