
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाच्या तिरंगी लढतीमध्ये अध्यक्षासह बहुसंख्य पदाधिकारी समता पॅनलचे निवडुण आले आहेत. अध्यक्षपदाची माळ ऍड.जानकीजीवन (आशिष) गोधमगांवकर यांच्या गळ्यात पडली आहे. ही निवडणूक बाहेर जिल्ह्यातील मतदारांमुळे जास्त चर्चेत आली. आजपर्यंतचे सर्वाधिक मतदान ऍड.गोधमगावकर यांना मिळाले.
दरदोन वर्षाला होणारी अभिवक्ता संघाची निवडणुक ऑगस्ट महिन्यात पार पडते. परंतू यंदा या निवडणुकीला 5 महिने उशीर झाला. या निवडणुकीत एकूण 1813 मतदारांनी आपली नोंदणी केली होती. त्यात त्यांनी शपथपत्र दिले होते की, आम्ही नांदेड जिल्ह्यात काम करतो.12 जानेवारी रोजी या निवडणुकीचे मतदान झाले. त्यात एकूण 1574 मतदारांनी आपला हक्क बजावला. त्यात 11 मतदानावर आक्षेप आला होता. एकूण 86.80 टक्के वकील बंधूंनी यात मतदान केले. या निवडणुकीत सहा पदाधिकारी आणि 12 सदस्य निवडले जातात.
काल दि.13 डिसेंबर रोजी रात्री उशीरा या निवडणुकीचा निकाल आला. त्यात अध्यक्षपद ऍड.जानकीजीवन (आशिष) दत्तात्रयराव गोधमगांवकर यांनी 1029 मतदान घेवून जिंकले. जनशक्ती पॅनलचे ऍड.राहुल हनुमंतराव कुलकर्णी यांना 275 मतदान मिळाले. परिवर्तन पॅनलचे ऍड.जगजीवन तुकाराम भेदे यांना 240 मतदान मिळाले. इतर पदाधिकाऱ्यांमध्ये उपाध्यक्ष पद ऍड.संजय खंडेराव वाकोडे यांनी 678 मतदान घेवून जिंकले. दुसऱ्या क्रमांकावर ऍड.सुरेश शेषराव देशमुख 526 मतदान घेवून तर तिसऱ्या क्रमांकावर ऍड.मोहम्मद अखमलोद्दीन (मोहम्मद अरशद) मोहम्मद गियासोद्दीन यांना 307 मतदान मिळाले. सचिव पदाची माळ ऍड.अमोल माधवराव वाघ यांच्या गळ्यात 598 मते घेतल्यामुळे पडली. दुसऱ्या क्रमांकावर ऍड.शिवाजी तुकाराम वडजे 501 आणि तिसऱ्या क्रमांकावर ऍड.शिवाजी गणेशराव सर्जे 410 मते. सहसचिव पदासाठी झालेल्या लढतीत विजयाची माळ ऍड.शेख रशिद रसुल पटेल 646 मते घेवून पडली. दुसऱ्या क्रमांकावर ऍड.प्रशांत प्रभु कोकणे 618 आणि तिसऱ्या क्रमांंकावर ऍड.सुभाष मुंजाजी बेंडे 234. कोषाध्यक्ष पदाच्या शर्यतित 5 उमेदवार होते. त्यात विजयाची माळ 528 मतदान घेणारे ऍड.मारोती गुंडप्पा बादलगावकर यांच्या गळ्यात पडली. दुसऱ्या क्रमांकावर ऍड.अभिलाष माधवराव नाईक 331, तिसऱ्या क्रमांकावर ऍड.मंगेश नारायणराव वाघमारे 290, चौथ्या क्रमांंकावर ऍड.संजयकुमार जयप्रकाश शर्मा 211 आणि पाचव्या क्रमांकावर ऍड.दिलीप माधवराव गंगातिर 154 असे मतदान प्राप्त झाले.विशिष्ट सहाय्यक पदावर 588 मतदान घेणारे ऍड.जयपाल मधुकर ढवळे विजयी झाले. दुसऱ्या क्रमांकावर ऍड.जुबेर खान अहेमद खान पठाण 552 आणि ऍड.रतन परमिंदरकौर चाहेल यांना 341 मतदान प्राप्त झाल्याने तिसरा क्रमांक मिळाला.
एकूण 12 सदस्य निवडायचे असतात. त्यामध्ये 1574 पैकी सर्वाधिक मतदान घेणारे आणि सदस्य पदावर आपला क्रमांक लावणारे 12 सदस्य पुढील प्रमाणे आहेत. ऍड.ज्योती रतनराव सुर्यवंशी(748), ऍड.मंगल शिवराज पाटील(744), ऍड.गोपाल किशनराव भोसले(703), ऍड.प्रितिश हनुमंतराव टेंकाळे (693), ऍड.यशोनिल उत्तमराव मोगले (685), ऍड.नगमा सिद्दीकी(664), ऍड.हनमंत बालाजी नरंगले(636), ऍड.वनिता सोपानराव बोईनवाड(636) ऍड.पिराजी कोंडीबा कदम(613), ऍड.संदीप बाबूराव ढगे(599), ऍड.प्रभज्योतसिंघ (प्रिन्स) रामगडीया(596), ऍड.आकाश शंकर खाडे (589) असे आहेत.
विजयी उमेदवारांनी आपला जल्लोष रात्रीच साजरा केला. पुढे येणाऱ्या नवीन न्यायालय इमारतीच्या शिलालेखावर अध्यक्ष म्हणून ऍड.आशिष गोधमगांवकर यांचे नाव नोंदवले जाईल पण त्यांचा कार्यकाळ पुर्ण होण्याअगोदर नवीन न्यायालय इमारतीचे उद्घाटन होणे आवश्यक आहे. या निवडणुकीची जबाबदारी पार पाडणारे निवडणुक निर्णय अधिकारी ऍड.युसूफझई एम.एस., सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी ऍड.एस.जी.सिंघ लोणीवाले, ऍड.पी.बी.जगताप यांनी अत्यंत उत्कृष्ट नियोजन करून निवडणुक मतदान प्रक्रिया, निवडणुक निकाल प्रक्रिया आपल्या सहकारी वकील मंडळींच्या सहाय्याने उत्कृष्टपणे पार पाडली.
