नांदेड(प्रतिनिधी)-मुंबई येथील उल्हासनगर मध्ये आयोजित फातिमाबी सावित्री उत्सव 2024 याचं दशकपूर्ती सोहळा थाटामानाने शहीद जनरल अरुण कुमार वैद्य टाऊन हॉल येथे 13 जानेवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आला होता.
कायद्याने वागा लोकचळवळ या संस्थेच्या वतीने गेल्या दहा वर्षापासून फातिमाबी सावित्री उत्सव साजरा केला जातो या अंतर्गत दरवर्षी पाच सावित्रींचा सन्मान करण्यात येतं ज्या महिलेंनी आपल्या क्षेत्रांमध्ये कारकिर्दी करून वेगळ्या ठसा उमटवलेला आहे किंवा त्या महिलेचा कार्यातून इतरांना प्रेरणा मिळत असेल अशा सावित्रींचा सन्मान दरवर्षी ते करतात यावर्षीचा हा बहुमान नांदेडच्या प्रसिद्ध कलावंत व पारलिंगी सामाजिक कार्यकर्ता डॉ. सान्वीजेठवाणी यांना 2024 चा फातिमाबी सावित्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
सदरील पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय मंगला गोपाळ, राष्ट्रवादीच्या हरकिरणकर धामी, ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा देशपांडे, लेखिका शिल्पा कांबळे व राज आसरोंडकर या मान्यवरांच्या हस्ते सदरील पुरस्कार देण्यात आला. पुरस्काराचा स्वरूप म्हणून प्रशस्तीपत्र मानचिन्ह सावित्रीबाई फुलेंची प्रतिमा व रोख रक्कम देऊन सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे सन्मान करण्यात आले. पुरस्कार प्राप्त करून डॉ. जेठवाणी उत्तर देताना हा पुरस्कार आपण घराबाहेर जो मोठा कुटुंब तयार केला आहे त्याला समर्पित असल्याचे प्रतिपादन मंचावरून केलं व शिक्षणाशिवाय कुठलेही ध्येय गाठता येत नाही म्हणून शिक्षणाच्या आधारावर आज आपण जे काही करू शकलो ते फक्त शिक्षणामुळे असल्याचं देखील त्यांनी यावेळेस नमूद केलं व आपण अनेक थोर व्यक्तिमत्व व महापुरुषांच्या आदर्शाने आपला आयुष्य घडवत आहोत आणि लवकरच राजकारणात पदार्पण करण्याचे देखील या वेळेस जाहीर केलं. नवीन वर्षाचा त्यांचा हा दुसरा पुरस्कार असून सात जनवरी रोजी नांदेड येथे त्यांना किसना गौरव पुरस्कार 2024 नंतर हा दुसरा पुरस्कार मिळाल्याने अति आनंदी आणि प्रोत्साहन मिळण्याचे काम या पुरस्काराच्या माध्यमाने होत आहे असं त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं. त्यांचा या प्राप्ती बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.
