नांदेड (प्रतिनिधी)-मुदखेड तालुक्यात राहणारी एक 6 वर्षीय बालिका रविवार दि.14 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता बेपत्ता झाली होती. आज दि.15 जानेवारी रोजी त्या 6 वर्षीय बालिकेचा मृतदेह मुदखेड-उमरी रस्त्यावर सापडला.
काल दुपारी गायब झालेल्या 6 वर्षीय बालिकेचाा मृतदेह जवळपास 18 तासानंतर सापडला या घटनेला पोलीसांनी अत्यंत गांभीर्याने घेतले असून भोकरचे अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक यांनी थेट घटनास्थळाला भेट दिली. सोबतच श्वानपथकाला पाचारण करण्यात आले.पण त्यात काही मोठे यश आले नाही अशी माहिती प्राप्त झाली. मुदखेडचे पोलीस निरिक्षक वसंत सप्रे सहाय्यक पोलीस निरिक्षक समर शिंदे, बी.आर.कांबळे आदींनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात या 6 वर्षीय बालिकेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय येथे पाठविला आहे.
या चिमुकल्या बालिकेच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पण समाजाची अवस्था अत्यंत दुर्देवी झाली असल्याचा उल्लेख करावाच लाागेल.कारण 18 तासात कुठे ना कुठे, कोणी तरी ही चिमुकली बालिका जिवंत पाहिलीच असणार आणि समाजाची दृष्टी एवढी निषप्रभ झाली आहे की, त्या बालिकेच्या डोळया मागे लपलेले दु:ख कोणीच ओळखू शकले नाही. कधीच सुधारेल समाज आपल्या घराच्या बालिकेवर असा प्रसंग आला तर आपण काय केले असते हे फक्त एवढाच विचार समाजाने केला तर अशा घटना पुन्हा घडणार नाहीत.
बेपत्ता झालेल्या 6 वर्षीय बालिकेचा मृतदेह 18 तासांनी सापडला