नांदेड(प्रतिनिधी)-ग्राम पंचायत निळा येथील झालेल्या विकास कामांबद्दल ती कामे 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून न करता काही कामांची बिले उचल करण्यात आली आहेत. याबाबत चौकशी होवून संबंधीतांवर दंडात्मक कार्यवाही करावी अन्यथा 15 फेबु्रवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमक्ष आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन निळा येथील नागरीक रोहिदास आनंदराव हिंगोले यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्यालय आणि गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदेड यांना दिले आहे.
निळा ता.जि.नांदेड येथी रोहिदास आनंदराव हिंगोली यांनी दिलेल्या निवेदनानुसार ग्राम पंचायत निळा येथील कार्यालयावर वॉटर हारवेस्टींग या कामासाठी काम न करताच 2 लाख 50 हजार रुपये उचल करण्यात आली आहे. तसेच अंगणवाडी क्रमांक 1 येथे संरक्षण भिंत न बांधताच त्यासाठीचा 2 लाख रुपये निधी उचलून घेण्यात आला आहे. पेवर ब्लॉकचे काम करतांना त्याखाली बेड तयार करणे आवश्यक आहे. परंतू फक्त साधी चुरी टाकून हे काम करण्यात आले आहे. या सर्व चुकीच्या कामांबद्दल सखोल चौकशी करून निळाचे भ्रष्ट सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कार्यवाही करावी नसता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 15 फेबु्रवारी 2024 पासून मी आमरण उपोषण करणार असल्याचा उल्लेख रोहिदास आनंदराव हिंगोले यांनी आपल्या निवेदनात केला आहे.
निळा ग्राम पंचायत अंतर्गत झालेल्या चुकीच्या कामांची चौकशी व्हावी-निवेदन