नांदेड (प्रतिनिधि)-पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या नांदेड जिल्हा निमंत्रक पदी प्रदीप नागापूरकर यांची तर समन्वयकपदी रवींद्र संगनवार यांची नियुक्ती करण्यात येत आहे.. राज्य निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी आज येथे ही घोषणा केली..
पत्रकारांवरील वाढते हल्ले आणि कुचकामी ठरलेला पत्रकार संरक्षण कायदा या पार्श्वभूमीवर पत्रकारांचा संघटीत आवाज उठविण्यासाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती काम करते.. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात समितीच्या शाखा असून नव्याने निमंत्रक व समन्वयक नियुक्त केले जात आहेत..
नांदेड जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या निमंत्रक पदी प्रदीप नागापूरकर आणि समन्वयकपदी रवींद्र संगनवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. त्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात राज्य निमंत्रकांच्या पुर्व परवानगीने निमंत्रक आणि समन्वयक नेमावयाचे आहेत..जिल्हा आणि तालुका निमंत्रक आणि समन्वयकांनी संघटनेची शिस्त पाळावी असेही त्यांना सांगण्यात आले आहे..
एस.एम.देशमुख, किरण नाईक, शरद पाबळे, मिलिंद अष्टीवकर, मन्सूरभाई शेख आदिंनी नागापूरकर आणि संगनवार यांचे अभिनंदन केले आहे..