बिलोली(प्रतिनिधी)-नायगाव तालुक्यातील सावरखेड येथील एका 11 वर्षाच्याा मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून त्याचा खून केल्याप्रकरणी आरोपी गिरी गंगाराम कोठेवाड रा.मराठागल्ली मुदखेड याला फाशीची शिक्षा आणि 10 हजार रुपये दंड असा सक्षम कारावासाची शिक्षाा अतिरिक्त सत्र न्यायाधीश दिनेश ए.कोठलीकर यांनी सुनावली आहे.
नायगाव तालुक्यातील सावरखेड येथे दि.5 सप्टेंबर 2017 रोजी गावत सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणूक होती. या मिरवणूकीत मयत ऋषीकेश शिवाजी आपतवाड (11) व त्यांचे वडील तसेच अन्य गावातील लोक हे विसर्जन मिरवणूकीत सहभागी झाले होते. मिरवणूक ही शाळेपासून तळ्याकडे गेली असता ऋषीकेश आणि त्याचे वडील सायंकाळी 6 वाजेच्यासुमारास घरी परतले, दोघांनी जेवन केल, ऋषीकेश सायंकाळी 6.30 च्या सुमारास अंगणात खेळत होता. बराच वेळ झाल तो घरी परत न आल्यामुळे त्याची आई,वडील, काका आजूबाला शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र तो मिळून आला नाही रात्री उशीरा11.30 वाजेच्या सुमारास मारोती मंदिराच्या पाठीमागील नियोजित मंदिराच्या शिखराखाली तळमजल्याच्या खोलीत बिघतले असता मुलाचे प्रेत त्या ठिकाणी पडलेले दिसून आले. त्याच्या अंगावर गंभीर दुखापत झालेल्या जखमा आढून आल्या होत्या, त्याच्या शेजारी काही काचेचे तुकडे पडलेले होते. याचबरोबर त्याची अंगावरील पॅन्टही खालपर्यंत काढण्यात आली होती. पोलीस तपासात लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली व मुलाचा खून झाल्याची माहिती मिळाली. याबाबत ऋषीकेशचे वडील शिवाजी दिगंबर आपतवाड यांनी कुंटूर पोलीस ठाण्यात तक्रारी दिली. याप्रकरणी आरोपींविरुध्द 302, 377 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा तपास करून बिलोली सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. हा खटलाल बाल संरक्षण न्यायालयात चालविण्यात आला. यामध्ये एकूण 12 साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयासमोर आलेल्या साक्ष पुराव्या आधारे न्यायाधीश दिनेश ए. कोठलीकर यांनी आरेापी गिरीश गंगाधराम कोटेवाड रा.मराठा गल्ली मुदखेड यास फाशीची शिक्षा व दंड 10 हजार रुपये तसेच दंड न भरल्यास एक महिन्याच्या सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली. तर कलम 377 अंतर्गत 10 वर्ष तुरूंगवासाची शिक्षा व 10 हजार रुपये दंड शिक्षा सुनावाली आहे. कलम 6 पोक्सो अंतर्गत मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षाच्यावतीने संदीप कुंडलवाडीकर यांनी बाजू मांडली.