नांदेड,(प्रतिनिधी)-वाजेगाव – मुदखेड रस्त्यावरील बायपास पुलाजवळ टिपर मोटार सायकल आपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याचा प्रकार आज घडला आहे.
नांदेड जिल्ह्यातील वाजेगाव ते मुदखेड रस्त्यावरील बायपास पुलाजवळील अहमद चौकाजवळ आज सकाळी 10 वाजता टिपर आणि मोटार सायकलच्या आपघातात वांगी येथील तरुण राहुल नामदेव तारु वय 25 वर्ष हे नेहमीप्रमाणे सकाळी रेनॉल्ट शोरुम येथे कामावर जात असतांना वाजेगाव बायपास पुलाजवळ मोटारसायकल चालकाच्या अंगावरून टिपर वाहन गेल्याने यात तरुणाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. यावेळी नागरिकांची एकच गर्दी झाल्याचे बघावयास मिळाले.
याठिकाणी बायपास रस्त्याचे काम अनेक दिवसापासुन मंद गतीने होत असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजुची वाहतूक बंद आहे. हे काम तातडीने पूर्ण करून दोन्ही बाजूचा रास्ता सुरू करावा अशी मागणी करण्यात येत आहे.