विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनी बँक खाती 31 जानेवारीपूर्वी आधार संलग्न करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) – संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना व राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना या योजनेमधील पात्र लाभार्थ्यांनी या योजनेत उघडण्यात आलेली बँक खाती 31 जानेवारी 2024 पूर्वी आधार संलग्न करुन घ्यावीत. तसेच ह्यात प्रमाणपत्र संबंधित तलाठी यांचेकडे सादर करावे, असे आवाहन तहसिलदार (संगायो) नांदेड शहर यांनी केले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे 8 जानेवारी 2024 रोजीच्या पत्रानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी द्वारे एका महिन्यात करण्याचे शासन निर्देश आहेत. या योजनेतील सर्व लाभार्थ्यांनी या योजनेत उघडण्यात आलेली बँक खाती 15 जानेवारीपर्यत आधार संलग्न करण्याबाबत आवश्यक असल्याचे कळविले आहे. तसेच यापुढे आधार संलग्न न केल्यास माहे जानेवारी 2024 पासून अनुदान वितरण करण्यात येणार नाही, असे तहसिलदार संगांयो शहर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *