नांदेड(प्रतिनिधी)-लोहा शहरातील नांदेड ते लातूर रोडवरील स्मशानभुमीच्या बाजूला असणाऱ्या सदगुरू इंजिनिअर वर्कसचे दुकान अज्ञात आरोपीने शटर फोडून दुकानातील मोटार भरण्याची नवीन व जुनी तांब्याची तार, इतर साहित्य असा एकूण 1 लाख 99 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल अज्ञान आरोपीने दि.17 ते 18 जानेवारीच्या मध्यरात्री चोरून नेल्या प्रकरणी सचिन रमेशराव निधानकर(42) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन लोहा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार लाडेकर हे करीत आहेत.