
नांदेड(प्रतिनिधी)-प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर यांच्या उपस्थितीत वकील संघटनेने प्रभु रामचंद्रांच्या मुर्ती प्रतिष्ठापणा दिवशी त्यांना अभिवादन केले.
आज अयोध्येत राम मंदिर प्रतिष्ठापणा झाली. दुपारी मध्यांतर काळात न्यायालय परिसरात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर, अतिरिक्त सत्र न्यायाधीश शशिकांत बांगर, सी.व्ही.मराठे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ऍड.आशिष गोधमगावकर आणि इतर संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी प्रभु श्री राम वंदनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी सर्वांनी प्रभु श्री रामचंद्रांबद्दल आपले विचार व्यक्त केले. आजच्या परिस्थितीत रामचंद्रांच्या जीवनाचे आकलन करून आपल्या जीवनात पुढे जाण्याचा विषय कसा हाताळता येतो यावर आपल्या शब्दात विवेचन केले.