
नांदेड(प्रतिनिधी)-मुदखेड तालुक्यातील अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या नराधमाला काल अटक झाल्यानंतर आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी 9 दिवस अर्थात 31 जानेवारी 2024 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणातील पहिला पापी 31 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत आहे.
15 जानेवारी रोजी एका 6 वर्षीय अल्पवयीन बालिकेचे प्रेत मुदखेड-उमरी रस्त्यावर सापडले. या बालिकेची अवस्था लिहिण्या इतपत दम वास्तव न्युज लाईव्हच्या लेखणीत नाही. पोलीस प्रमुख श्रीकृष्ण कोकाटे आणि त्यांच्या अनेक सहकारी अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी रात्रंदिवस मेहनत करत घेतलेल्या परिस्थितीला शिक्कामोर्तब केले ते म्हणजे पोलीस दलातील शेरु या श्वानाने आणि 20 जानेवारी रोजी अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करणारा पहिला पापी दशरथ उर्फ धोंडीबा फुलाजी पांचाळ (23) यास अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला 12 दिवस अर्थात 31 जानेवारी 2024 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले. पोलीस कोठडी दरम्यान पोलीसांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार दशरथ उर्फ धोंडीबा पांचाळचा मित्र माधव उर्फ मल्या दिलीप शिंदे (23) हा सुध्दा त्या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करण्यात सहभागी आहे. म्हणून त्याला 21 जानेवारी रोजी रात्री अटक झाली. या गुन्ह्याचे तपासीक अंमलदार पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक, सहाय्यक पोलीस अधिक्षक चंद्रकांत पवार आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी आज न्यायालयात हजर केले. न्यायालयात या दोघांनी बालिकेवर अत्याचार करून तिचे प्रेत कोणत्या वाहनात घरापासून 17 किलो मिटर दुर नेले याचा शोध करायचा आहे, इतर बऱ्याच कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करणे आवश्यक आहे असा युक्तीवाद सहाय्यक सरकारी वकील ऍड.एम.ए.बत्तुल्ला(डांगे) मांडला. या आरोपींबद्दल जिल्हा वकील संघटनेने कोणीही वकील पत्र देणार नाही असा ठराव घेतलेला आहे. सरकारी पक्षाचा युक्तीवाद ऐकून न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी माधव उर्फ मल्याला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
संबंधीत बातमी…
https://vastavnewslive.com/2024/01/21/मुदखेड-पिडीत-बालिका-प्रक/