नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक कार्यालयात आज शुक्रवार दि.23 जुलै रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती साजरी करतांना पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळेसह अनेक अधिकाऱ्यांनी बाळ गंगाधर टिळक यांना अभिवादन करून आपले श्रध्दासुमन अर्पित केले.
आज 23 जुलै बाळ गंगाधर टिळक यांची जयंती. पोलीस अधिक्ष प्रमोदकुमार शेवाळे यांनी आज बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. त्यांच्यासोबत गृहपोलीस उपअधिक्षक विकास तोटावार, बिलोलीचे पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर धुमाळ, जनसंपर्क अधिकारी शिवाजी लष्करे, कार्यालय अधिक्षक जाधव, जनसंपर्क विभागातील पोलीस अंमलदार उत्तम वाघमारे, सुर्यभान कागणे, रेखा इंगळे यांच्यासह पोलीस अधिक्षक कार्यालयातील सर्वच शाखाचे पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार आणि कार्यालयीन कर्मचारी हजर होते.
