नांदेड(प्रतिनिधी)- एका व्यक्तीला लुटण्याच्या उद्देशाने हल्ला करून त्याचा गळा चिरुन शिर धडावेगळे करणाऱ्या आरोपीला मुख्य न्यायदंडाधिकारी किर्ती जैन-देसरडा यांनी 6 दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.5 जानेवारी रोजी फटाका मैदानावर विकास राऊत नावाच्या युवकाचा खून झाला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेने शोध घेवून दोन जणांना पकडले होते. त्यातील एक भारतसिंघ उर्फ युवराजसिंघ धारासिंघ बावरी (35) रा.भावेश्र्वरनगर चौफाळा यास काल अटक झाल्यानंतर आज वजिराबादचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवराज जमदडे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयात प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस कोठडी मागण्यात आली ती न्यायाधीशांनी 6 दिवस अर्थात 30 जानेवारी 2024 पर्यंत मारेकरी भारतसिंघला पोलीस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणात भारतसिंघ सोबत जय नावाचा पूर्ण नाव माहिती नसलेला आणखी एक आरोपी आहे.