नांदेड(प्रतिनिधी)-सन 2016 मध्ये एका महिलेच्या घरामध्ये घुसून तिचा विनयभंग करणाऱ्या व्यक्तीची शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर यांनी कायम ठेवली आहे.
पोलीस ठाणे हदगावच्या हद्दीतील एका गावात 17 डिसेंबर 2016 रोजी महिला घरात एकटी असल्याचे पाहुन त्यावेळी 21 वर्ष वय असलेला व्यक्ती संजय दिलीपराव कानवले हा त्या घरात शिरला आणि घरातील महिलाचा विनयभंग केला. या संदर्भाने महिलेच्या तक्रारीनंतर हदगाव पोलीसांनी गुन्हा क्रमांक 389/2016 दाखल केला. ज्यामध्ये भारतीय दंड संहितेची कलमे 354(अ), 448, 336 आणि 337 या कलमांचा समावेश होता. पोलीस तपास अधिकारी दत्तात्रय वाघमारे यांनी तपास पुर्ण करून संजय दिलीपराव कानवले विरुध्द हदगाव प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले. हदगाव न्यायालयात आठ साक्षीदार तपासण्यात आले.हदगाव न्यायालयाने उपलब्ध पुरावा आधारे संजय दिलीपराव कानवलेला शिक्षा ठोठावली होती.
या शिक्षेविरुध्द संजय कानवलेने जिल्हा व सत्र न्यायालयात फौजदारी अपील क्रमांक 70/2019 दाखल केले. या अपील प्रकरणाची सुनावणी झाली तेंव्हा समोरल आलेल्या तथ्यांप्रमाणे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर यांनी संजय कानवलेला दिलेली शिक्षा भारतीय दंड संहितेच्या कलम 354(अ) प्रमाणे एक वर्ष शिक्षा आणि दोन हजार रुपये दंड तसेच कलम 448 प्रमाणे सहा महिने शिक्षा आणि 500 रुपये रोख दंड या शिक्षा कायम ठेवल्या आहेत. त्यामुळे आता संजय दिलीपराव कानवलेला तुरुंगात जावे लागले आहे. फौजदारी अपील प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने ऍड.महेश कागणे यांनी काम पाहिले.
सन 2016 मध्ये महिलेचा विनयभंग केला; जिल्हा न्यायालयात शिक्षा कायम