भारताचे प्रजासत्ताक हे जगभरातले प्रगल्भ प्रजासत्ताक-जिल्हाधिकारी राऊत

नांदेड(प्रतिनिधी)-75 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभकामना देतांना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आपल्याला ज्यांच्यामुळे हे स्वातंत्र्य मिळाले आणि त्यानंतर प्रजासत्ताकाची स्थापना झाली. ते भारतीय प्रजासत्ताक जगभरात प्रगल्भ प्रजासत्ताक म्हणून मानले जाते असे सांगितले.
आज भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 75 व्या दिनानिमित्त पोलीस मुख्यालयाच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर सर्व प्रथम जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यावेळी व्यासपीठावर विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.शशिकांत महावरकर, खा. प्रताप पाटील चिखलीकर, आ.बालाजी कल्याणकर, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर, माजी आ.अमरनाथ राजूरकर, माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर अनेक पोलीस अधिकारी, इतर अधिकारी ज्येष्ठ नागरीक, स्वतंत्रता सैनानी यांची उपस्थिती होती.

पोलीस उपअधिक्षक मुख्यालय डॉ.अश्र्विनी जगताप यांनी परेड कमांडर म्हणून आपली जबाबदारी पार पाडली. त्यांच्यासोबत महिला-पुरूष पोलीसांचे वेगवेगळे पथक, सीआरपीएफ मुदखेडचे पथक, सैनिक विद्यालय यांचे पथक आणि घोडेस्वार पथक, वाहतुक शाखेचे पथक, राष्ट्रीय छात्रसेनेचे पथक, श्वान पथक, गृहरक्षक दलाचे पथक यांनी उपस्थितीत मान्यवरांना सलामी दिली.
या प्रसंगी पुढे बोलतांना अभिजित राऊत म्हणाले की, आपल्या प्रजासत्ताकाला समृध्द करण्याची जबाबदारी सर्वांची असते. आम्ही फक्त जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी एक दुवा आहोत. भारतीय प्रजासत्ताकाला अपेक्षीत असलेले सर्व कर्तव्य आम्ही वेळोवेळी केले पाहिजे.
केंद्र सरकारने यंदा 743 लोकांना देशभरात राष्ट्रपती पोलीस पदक दिले. तयात नांदेडच्या दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत पोलीस निरिक्षक माणिक बेद्रे यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. मुदखेडच्या गुन्ह्याची उकल करणारे पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक, सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष शेकडे यांना उत्कृष्ट तपास अधिकारी म्हणून सत्कार करण्यात आला.पोलीस अंमलदार बालाजी अंबलवाड, गजानन पल्लेवाड यांचाही सन्मान यावेळी झाला. विविध बंदोबस्तमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे वजिराबादचे पोलीस उपनिरिक्षक रमेश शंकरराव खाडे यांचाही सन्मान आज करण्यात आला.होमगार्ड कार्यालयाचे राम बाळकृष्ण पिंजरकर व अरुण तेजराव परिहार, जिल्हा कारागृहातील महिला पोलीस अर्चना डाखोरे यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभात सर्वात आकर्षक सत्कार श्वान शेरुचा होता. त्याने मुदखेड प्रकरणात आरोपी शोधण्यात पोलीसांची मदत केली.

शाळा महाविद्यालयातून बालक बालिकांनी मिरवणूका काढत आजच्या प्रजासत्ताक दिनाला अभिवादन केले. शहरात अनेक घरांवर, अनेक प्रतिष्ठांणावर तिरंगाध्वज उभारण्यात आला होता. पोलीस कवायत पथकांनी सुध्दा शहरातून संचलन करत प्रजासत्ताक दिन साजरा केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *