नांदेड (प्रतिनिधी)- पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे मुळ मुल्यांकनाच्या दुप्पट किंमतीत बऱ्याच वर्षांपासून पडीत असलेल्या दुचाकी वाहनांची विक्री भंगार या सत्रात आज अत्यंत पारदर्शकपणे पार पडली. या लिलावातून 1 लाख 5 हजार रूपये रक्कम शासकीय खात्यात जमा झाली आहे.
नांदेड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 52 बेवारस दुचाकी वाहने बऱ्याच वर्षांपासून उभी होती. अशा वाहनांना लिलावाद्वारे विकण्याची प्रक्रियासुरू झाली आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील ही प्रक्रिया आज पोलीस निरीक्षक आनंद नरूटे, सहायक पोलीस निरीक्षक रवी वावळे, पोलीस उपनिरीक्षक भगवान सावंत, गंगाधर लष्करे, पोलीस अंमलदार बालाजी बाचोटकर, संजय मुंडे, रामकिशन मोरे, बालाजी रावळे, रवीशंकर बामणे, दत्तात्रय कांबळे, विशाल अटकोरे, मिर्झा, मधुकर आवातीरक, राजकुमार डोंगरे, काकासाहेब जगताप यांच्या उपस्थितीत या गाड्या विक्री करण्यात आल्या.
या 52 गाड्यांपैकी 22 गाड्यांचे मालक यांनी आपल्या वाहनांचा ताबा पोलीस ठाणे शिवाजीनगरकडे दाखविल्यानंतर ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. उर्वरीत 30 बेवारस वाहनांची मुळ मुल्यांकन किंमत 52 हजार 500 रूपये ठरविण्यात आली होती. लिलावामध्ये या 30 गाड्यांची विक्री 1 लाख 5 हजार रूपयांमध्ये झाली. पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी शिवाजीनगर पोलिसांच्या कामाचे कौतुक केले आहे.
