
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील राखीव पोलीस उपनिरिक्षक, दोन श्रेणी पोलीस उपनिरिक्षक आणि एक सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक अशा चार जणांना त्यांच्या सेवानिवृत्तीचा निरोप देतांना आता तुम्हाला आपल्या मनासारखे जीवन जगण्याची संधी आहे असे प्रतिपादन केले.
आज दि.31 जानेवारी 2024 रोजी नांदेड जिल्हा पोलीस दलातील राखीव पोलीस उपनिरिक्षक काशीनाथ मारोतराव बोरकर (पोलीस मुख्यालय), श्रेणी चालक पोलीस उपनिरिक्षक सुर्यकांत श्रीराम गुट्टे (पोलीस ठाणे नायगाव), श्रेणी पोलीस उपनिरिक्षक जसवंतसिंघ हुजूरासिंग शाहु (स्थानिक गुन्हे शाखा) आणि सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक राजाराम चंदरराव मिरदौड (पोलीस ठाणे देगलूर) असे चार जण आपल्या पोलीस सेवेतील विहित सेवापुर्ण करून आज सेवा निवृत्त झाले. या सर्वांना पोलीस अधिक्षक कार्यालयातील मंथन हॉलमध्ये सहकुटूंब निरोप देण्यात आला.
याप्रसंगी पुढे बोलतांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे म्हणाले की, आजपर्यंत तुम्हाला अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या आदेशांवर वागणे आवश्यक होते. आजनंतर कोणीही आदेश देणार नाही. तसेच कोणी आपला आदेश ऐकत नाही याची चिंता सुध्दा संपेल. तेंव्हा आपल्या मनासारखे जगा, कुटूंबाकडे लक्ष द्या, काही गरज पडली तर नांदेड जिल्हा पोलीस दल तुमच्या मदतीसाठी सदैव तयार असेल. या कार्यक्रमात अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे, पोलीस उपअधिक्षक मुख्यालय डॉ.अश्र्विनी जगताप, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सर्व पोलीस ठाणे स्वाधीन अधिकारी, पोलीस कल्याण विभागाचे पोलीस निरिक्षक नामदेव रिठ्ठे, सहाय्यक पोलीस निरिक्षक तथा जनसंपर्क अधिकारी शिवाजी लष्करे, पोलीस कल्याण विभागातील पोलीस उपनिरिक्षक माया भोसले यांच्यासह मंत्रालयीन अधिकारी व कर्मचाी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक विठ्ठल कत्ते यांनी केले. पोलीस कल्याण विभागातील पोलीस अंमलदार राखी कसबे यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.
