नांदेड जिल्ह्यातील 49 पोलीस अंमलदार जाणार महामार्ग सुरक्षा पथकात प्रतिनियुक्तीवर 

नांदेड(प्रतिनिधी)-31 जानेवारीच्या बदल्यांमध्ये अपर पोलीस महासंचालक डॉ.रविंद्रकुमार सिंघल यांची बदली नागपूर पोलीस आयुक्त या पदावर करण्यात आली. त्या अगोदर 30 जानेवारी रोजी त्यांनी नांदेड जिल्ह्यातील 49 पोलीस अंमलदारांना महामार्ग सुरक्षा पथकात प्रतिनियुक्ती केली आहे. नांदेडचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलीस अंमलदारांच्या सेवा पटाची तपासणी करून पाठवलेली 49 लोकांची यादी डॉ.रविंद्रकुमार सिंघल यांनी 30 जानेवारी रोजी मंजुर केली आहे.
नांदेड पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी महामार्ग सुरक्षा पथकाकडून आलेल्या मागणीनुसार आपल्या जिल्ह्यातील पोालीस अंमलदारांच्या सेवा पटाची तपासणी केली आणि सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या जास्तीत जास्त बक्षीसे प्राप्त करणाऱ्या 49 पोलीस अंमलदारांची यादी महामार्ग सुरक्षा पथकाचे प्रमुख डॉ.रविंद्रकुमार सिंघल यांना पाठविले. 30 जानेवारी रोजी डॉ.सिंघल यांनी ही यादी मंजुर केली आणि दुसऱ्याच दिवशी त्यांना नागपूर पोलीस आयुक्त पदाची नियुक्तीपण मिळाली.
नांदेडजिल्ह्यातून महामार्ग सुरक्षा पथकात जाणाऱ्या 49 पोलीस अंमलदारांमधून 30 पोलीस अंमलदार आणि 3 चालक देगलूर येथे नव्याने सुरू होणाऱ्या महामार्ग सुरक्षा पथकात जातील. त्यातील 11 पोलीस अंमलदार अर्धापूर येथील महामार्ग सुरक्षा पथकात पाठविले जातील आणि पाच  पोलीस अंमलदार बारड येथील सुरक्षा पथकात पाठविले जाणार आहेत.
नांदेड जिल्ह्यातून प्रतिनियुक्तीवर जाणारे 49 पोलीस अंमलदार पुढील प्रमाणे आहेत. भरत टोपाजी केंद्रे (बकल नंबर 2811) वसंत जयवंतराव मरदौडे (572), माधव दगडोबा गिते(2701), रविकिरण जगन्नाथराव बाबर(3063), विशाल रामजी जाधव(3017), शंकर बालाजी भारती (3191), रामदास गोपाळराव कोल्हे(1603), धनराज रामबुवा पुरी (3041), महेश काशीराव अलीकर(2634), अंगद बालाजी सुर्यवंशी(3204), संतोष विठ्ठलराव केंद्रे(821), संतोष रामेश्र्वर घोसाळे(3227), चंद्रकांत दामोधर बिरदार(3013), शिवाजी प्रकाश डोगवे(1201), मानेजी सुर्यकांत वच्छेवार(1490), हनुमंत नामदेव बोईनवाड(220), विक्रम जळबाजी वाानखेडे(303), सतिश बलवंतराव कदम(157), राम प्रकाश वडजे(2854), शेख नदीर शेख मदार(2869), अनिलकुमार बसवंत सिधापुरे(386), बालाजी वसंतराव राठोड(2526), शेख रियाज शेख रजाक(569), दिपक माधवराव पवार(393), अरविंद प्रकाशराव इंगळे(2600), राहुल भगवान तारु(3022), बालाजी नामदेव केंद्रे(277), उमाकांत शेषराव चव्हाण(909), दिलीप शंकर राठोड(3065), सुशिल गोपीचंद राठोड(3215), कुणाल गौतम नरवडे(1514), विठ्ठल जगन्नाथ एडके(399), सिध्देश्र्वर बालाजी कागणे(3314), मेघराज रामपुरी(329), श्रीकांत मधुकर केंद्रे(1233), शिवकुमार नागोराव पांडे(1494), अशोक देविदास मस्के(3326), अंगद सुर्यकांत राऊत(3321), अब्दुल माजीद अब्दुल वाहिद (268), विरेंद्र दिगंबर पवार (1595), शंकर नामदेव जाधव (1184), राहुल गंगाधर वाघमारे(16), शहाजी शिवाजी जोगदंड(367), गोविंद दत्तात्रय वैजारपे(2625), गजानन उत्तमराव इंगळे(670), सुनिल साहेबराव सर्पे(691), सतिश शिवराम बुरूतवाड (1093), शैलेशकुमार रघुनाथ शिरसे(96), अनिलकुमार माधवराव मुपडे(2597).
या सर्व पोलीस अंमलदारांना एमएससीआयटी परिक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आणि वाहन चालविण्यात येते याचा परवाना पोलीस अधिक्षक संभाजीनगर परिक्षेत्र यांच्याकडे सादर करायचा आाहे. तसेच ही नियुक्ती तात्पुत्या स्वरुपाची आहे असे आदेश लिहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *