नांदेड(प्रतिनिधी)-स्नेहनगर पोलीस वसाहतीत राहणाऱ्या एका पोलीस अंमलदाराने वीज वितरण कंपनीचे 41 हजार 520 रुपये विद्युत बिल भरून सुध्दा आज पर्यंत त्याला नवीन विद्युत मिटर देण्यात आले नाही. तसेच त्यांच्या घरावरील पहिल्या मजल्यातील बाथरुममधून होणारी लिकेज त्यांच्या घराला त्रास देत आहे अशा आवस्थेत पोलीस अंमलदार जगत आहेत.
पोलीस वसाहत स्नेहनगर येथील बी-5 या इमारतीमध्ये कक्ष क्रमांक 52 मध्ये पोलीस अंमलदार निवृत्ती केंद्रे बकल नंबर 240 नेमणूक पोलीस ठाणे इतवारा यांचे वास्तव्य आहे. या घरावर वीज वितरण कंपनीने 41 हजार 520 रुपये वीज बिल थकबाकी दाखवली. खरे तर या घरात तोपर्यंत वीज मिटरच नव्हते. तरीपण एक चांगल्या नागरीकाच्या दृष्टीकोणाने विचार करत पोलीस अंमलदार निवृत्ती केंद्रे यांनी 41 हजार 520 रुपये भरले. तरीपण आज पर्यंत त्यांना नवीन वीज मिटर देण्यात आलेले नाही.

निवृत्ती केंद्रे यांनी याबाबत पोलीस अधिक्षकांना अर्ज दिला आहे. या अर्जाच्यासोबत दुसरा एक अर्ज दिला त्यात त्यांच्या रुम क्रमांक 52 वर असलेल्या घरातील बाथरुमचे लिकेज त्यांच्या घरात पडत आहे. त्यासाठी त्यांनी ते दुरुस्त करून देण्याची विनंती या अर्जात केली आहे. या अर्जासह कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना सुध्दा निवृत्ती केंद्रे यांनी आपले घर दुरूस्त करून द्यावे अशी विनंती करणारा अर्ज दिला आहे. तरी पण तशाच घाण अवस्थेत निवृत्ती केंद्रे यांना राहावे लागत आहे.
प्रत्येक पोलीस वसाहतीमध्ये एक कॉलनी इंचार्ज कार्यरत असतो. स्नेहनगर पोलीस वसाहतीमध्ये मोकाट कुत्रे नेहमी फिरत असतात या भागात राहणारी लहान बालके तेथेच खेळत असतात. अशा मोकाट कुत्रांकडून बालकांच्या जीवाला धोका असल्याचेही निवृत्ती केंद्रे यांना वाटते.