नांदेड(प्रतिनिधी)-सातव्या वेतन आयोगाचा हप्ता आणि इतर देयके ऑनलाईन पध्दतीने खाजगी शाळा,जिल्हा परिषद शाळा, इतर स्थानिक स्वराज्य संस्था, कटक मंडळे अंतर्गत कार्यरत असलेल्या व सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना थकीत देयके, सातव्या वेतन आयोगाचा हप्ता व इतर देयके ऑनलाईन पध्दतीने देण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक अंदाज व नियोजन दिपक चवणे यांनी जारी केले आहेत.
थकीत देयकाबाबत बऱ्याच तक्रारी आल्यानंतर खाजगी शाळांबाबत संचालक कार्यालयाने देयके देण्यास मंजुरी दिली आहे. ही सर्व देयके ज्येष्ठतेनुसार अदाज करण्याचे आदेश दिले आहेत. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा 2,3 व 4 था हप्ता व इतर थकीत देयके लवकरात लवकर देण्यात यावी. 1, 2 आणि 3 हे हप्ते राहिले असतील तर ते सर्व एकत्रीतपणे चौथ्या हप्त्यासोबत देण्यात यावे.
शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाचा हप्ता देण्याचे आदेश